नागरी उड्डाण मंत्रालय
नवीन विमानतळांची उभारणी आणि सुधारणा
Posted On:
19 DEC 2022 3:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2022
देशावर 21 ग्रीनफील्ड विमानतळ उभारण्यासाठी सरकारने तत्वतः मंजुरी दिली आहे. आत्तापर्यंत नऊ ग्रीनफिल्ड विमानतळ कार्यान्वित झाले आहेत आणि 11.12.2022 रोजी गोव्यातील मोपा येथे दहाव्या ग्रीनफिल्ड विमानतळाचे उद्घाटन झाले.
मोपा इथे उद्घाटन झालेला मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ वगळता वर्ष 2018 पासून सात ग्रीनफिल्ड विमानतळ आतापर्यंत कार्यान्वित झाले आहेत.
विमानतळांवर आधुनिक सुधारणा ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून हे काम वेळोवेळी हाती घेण्यात येते. यासाठी जागेची उपलब्धता , आर्थिक दृष्ट्या उपयुक्तता, सामाजिक आर्थिक गरज, वाढत्या वाहतूक व्यवस्थेची मागणी, विमानतळावर विमान वाहतूक करण्याची विमान कंपन्यांची तयारी अशा अनेक गोष्टींचा विचार करून हे काम हाती घेण्यात येते.
कोविड पूर्व काळामध्ये म्हणजे 2018-2019 या वर्षामध्ये देशभरातील विमानतळावरची वर्दळ 2017-18 या वर्षातील संख्येशी तुलना करता 11.6% ने वाढली आहे. महामारीच्या कालखंडात ती कमी झाली. मात्र 2020-21 या वर्षाच्या तुलनेत 2021-22 या वर्षात यामध्ये 63.7% वाढ झाली आहे.
नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
N.Chitale/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1884807)
Visitor Counter : 254