कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सर्व प्रकारच्या सेवांचा 24x7 पुरवठा करण्यासाठी आपले सरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नसल्याची अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांची ग्वाही

Posted On: 19 DEC 2022 9:01AM by PIB Mumbai

सर्व प्रकारच्या सेवांचा 24x7 पुरवठा करण्यासाठी आपले सरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही असे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी सांगितले आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात पाच दिवसांच्या ‘ प्रशासन गांव की ओर मोहीम’ या सुशासन सप्ताह 2022 चे उद्घाटन होणार आहे. या सप्ताहासाठी खंडू यांनी संदेश पाठवला आहे. दूरदृष्टी असलेले आपले माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाच्या सोबतच हा कार्यक्रम होत आहे, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

‘किमान सरकार, कमाल शासन’ या मंत्रासोबत आपले सरकार वचनबद्ध असल्याचा आणि प्रभावीपणा आणि कार्यक्षमता आणण्यासाठी एका मोहिमेच्या स्वरुपात शासन सुधारणा हाती घेतल्या असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला आहे. यामध्ये ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील 22 प्रकल्पांचा समावेश असून ते लोकांचे जीवनमान सुकर करण्यात मदत करतील.

सरकारच्या अग्रक्रमाच्या योजनांचा सर्व पात्र लाभार्थ्यांना संपूर्ण लाभ देण्यासाठी ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमामध्ये ऑक्टोबर 2022 मध्ये  सुधारणा करून ‘ सेवा आपके द्वार’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सरकारी यंत्रणेमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि सुशासन राबवण्यासाठी अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तक्रार निवारणासाठी लवकरच राज्याचे पोर्टल सुरू करण्यात येईल, ज्यामुळे नागरिकांच्या सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या कमी होतील, असे त्यांनी सांगितले.

***

Shailesh P/Sushama K/Cyadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1884686)