आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
एम्स बिबीनगर येथे आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या हस्ते उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
18 DEC 2022 7:38PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी आज एम्स(AIIMS) बिबीनगर येथे आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम ) सेवांचे उद्घाटन केले आणि व्हिडिओ द्वारे तज्ज्ञांच्या सल्लामसलतीचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष पाहिले. एबीडीएम हा देशभरातील आरोग्य नोंदी डिजिटल करण्यासाठी सरकारने सुरू केलेला उपक्रम आहे, या उपक्रमामुळे आरोग्य नोंदींची सुलभता वाढणार आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या (2022-23) नव्याने सामील झालेल्या तुकडीला महर्षी चरक शपथ दिली आणि प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थ्याला यश संपादन करण्यासाठी वचनबद्धता आणि समर्पण हे दोन महत्त्वाचे गुण अंगी बाळगण्याचे आवाहन केले. आरोग्याकडे कधीही व्यवसाय म्हणून पाहू नये, ही मानवतेची सेवा आहे, याचा पुनरुच्चार मांडविया यांनी केला. त्यांनी एम्स मधील शिक्षकांना हे सुनिश्चित करण्याचे आवाहन केले की, तरुण डॉक्टरांनी गरीबातील गरीब लोकांची सेवा करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी संस्थेच्या उपहारगृहामध्ये विद्यार्थ्यांसोबत भोजन केले आणि विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

***
S.Kane/V.Yadav/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1884619)
आगंतुक पटल : 225