आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद- बायोमेडिकल संशोधनासाठी राष्ट्रीय प्राणी संसाधन सुविधेचे  जेनोम व्हॅली, हैदराबाद येथे केले उद्घाटन


“कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी  संशोधन आणि नवोन्मेष हे महत्त्वाचे पैलू आहेत; भारताने स्वदेशी संशोधनाला चालना दिली असून त्याचा लाभ आता आपल्याला मिळत आहे”

Posted On: 17 DEC 2022 3:30PM by PIB Mumbai

 

कोणत्याही समाजाला पुढे जाण्यासाठी, संशोधन आणि नवोन्मेष या बाबी महत्त्वाच्या असतात. भारताने स्वदेशी संशोधनाला गती दिली असून त्याचा फायदा आता आपल्याला होत आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद - नॅशनल ॲनिमल रिसोर्स फॅसिलिटी फॉर बायोमेडिकल रिसर्चकडे 21 व्या शतकात बायोमेडिकल संशोधनात भारताला एक प्रमुख जागतिक घटक बनवण्याची क्षमता आहे. मानव आणि प्राण्यांची काळजी आणि वापरासाठी सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नैतिक मानकांचे पालन करून बायोमेडिकल संशोधन आणि प्रशिक्षणाच्या समर्थनासाठी दर्जेदार सेवांच्या तरतुदीद्वारे, ही संसाधन सुविधा राष्ट्राचे आरोग्य आणि कल्याण सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते,असे मत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज जेनोम व्हॅली, हैदराबाद येथे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद - नॅशनल ॲनिमल रिसोर्स फॅसिलिटी फॉर बायोमेडिकल रिसर्चचे उद्घाटन करताना व्यक्त केले. यावेळी तेलंगणाचे श्रम आणि रोजगार मंत्री सी. मल्ला रेड्डी हे देखील उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना डॉ. मांडविया यांनी स्वदेशी संशोधन आणि नवोपक्रमासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.

भारताची मनुष्यबळ आणि प्रतिभा शक्ती साजरी करताना डॉ. मांडविया म्हणाले की, सृजनाच्या क्षेत्रात भारतीय नेहमीच आघाडीवर राहिले आहेत, मग त्या संशोधन संस्था असोत, तंत्रज्ञान असोत किंवा औषध कंपन्या असोत. जगात बनवलेल्या औषधाच्या  प्रत्येक चार गोळ्यांपैकी एक गोळी भारतात बनते, असे डॉ. मांडविया यांनी जगाचे औषधालय म्हणून भारताची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करताना सांगितले. अशाप्रकारे, आम्हाला आता भारताला केवळ औषध निर्मितीचे नव्हे तर औषध विषयक संशोधनाचे केंद्र देखील बनवायचे आहे. हे घडण्यासाठी, आम्हाला क्लिनिकल चाचण्यांची मजबूत प्रक्रिया तयार करणे आवश्यक असून या चाचण्यांसाठी प्राण्यांच्या सुविधा आवश्यक आहेत. त्यामुळे, हा दृष्टीकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी आज उद्घाटन करण्यात आलेली सुविधा महत्त्वाची भूमिका बजावेल. असेही ते म्हणाले.

देशात संशोधन आणि नवोपक्रमाची उत्साही परिसंस्था निर्माण करण्याच्या भारत सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केला. दर्जेदार शिक्षण आणि संशोधन प्रशिक्षण सुलभ करण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे थेट कव्हरेज YouTube वर येथे पाहिले जाऊ शकते:

 Inaugurating the ICMR-National Animal Resource Facility For Biomedical Research - YouTube

Facebook: https://www.facebook.com/mansukhmandviya/videos/1413962979432636

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1884423) Visitor Counter : 200


Read this release in: English , Urdu , Tamil , Telugu