सांस्कृतिक मंत्रालय
जी 20 च्या प्रतिनिधींनी मुंबईतल्या कान्हेरी लेण्यांना दिली भेट
शास्त्रीय वाद्यसंगीताचा घेतला आनंद
Posted On:
16 DEC 2022 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2022
पर्यटन मंत्रालयाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने जी 20 प्रतिनींधींसाठी आयोजित केलेल्या भारतीय शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमाने जी 20 च्या प्रतिनिधींना मंत्रमुग्ध केले. मुंबई येथे जी 20 च्या विकास गटाच्या बैठकीत उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी आज मुंबईतील कान्हेरी लेण्यांना भेट दिली. प्रतिनिधींच्या आगमनानंतर, अथर्व कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या युवा टुरिझम क्लबच्या विद्यार्थ्यांनी सर्व प्रतिनिधींचे पारंपरिक स्वागत केले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरामधील तुलसी लॉग हट्स येथे आयोजित दुपारचे भोजन आयोजित केले होते. यावेळी इंडिया टुरिझम, मुंबईच्यावतीने आयोजित शास्त्रीय वाद्य संगीताचा प्रतिनिधींनी आनंद घेतला.







S.Kakade/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1884291)
Visitor Counter : 268