रेल्वे मंत्रालय
उधमपूर-श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे जोडणी प्रकल्पासाठी (USBRL) आणखी एक अभिमानास्पद क्षण: हिमालय पर्वतात सर्व आव्हांनावर मात करत, मोठी पोकळी निर्माण करुन भारतातील सर्वात लांब भुयारी बोगदा तयार करण्यात मोठे यश
Posted On:
15 DEC 2022 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2022
हिमालय पर्वतातून, ब्रॉड गेज रेल्वे चालवण्यासाठी, भारतीय रेल्वेने अतिशय कठीण आणि महत्वाकांक्षी असा उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे जोडणी (यूएसबीआरएल) राष्ट्रीय प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प काश्मीर प्रांताला उर्वरित भारताशी जोडणार आहे. आज म्हणजेच, 15 डिसेंबर 2022 रोजी, या प्रकल्पात एक मोठे यश रेल्वेला मिळाले आहे. या प्रकल्पाच्या कटरा-बनिहाल भागात, सुंबर आणि खारी या स्थानकांदरम्यान, भुयारी बोगदा- टी 49 तयार करत, रेल्वेच्या अभियंत्यांनी एक मोठा मैलाचा दगड रचला आहे. या बोगद्याची लांबी 12.895 किलोमीटर इतकी असून, हा भारतातील सर्वात लांब भुयारी बोगदा आहे. हा भुयारी बोगदा खणतांना, त्याची समान पातळी आणि स्तर एकसारखा ठेवण्यातही तंत्रज्ञांना यश आले आहे. यूएसबीआरएलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी, एस. पी. माही यांच्या उपस्थितीत हा बोगदा पूर्ण करण्यात, सगळ्या चमूला यश आहे. टी-49 हा एक दुहेरी बोगदा असून, त्यात, मुख्य बोगदा (12.75 किमी)आणि भुयारी बोगदा (12.895 किमी) अशी एकूण लांबी आहे.
भारतीय रेल्वेच्या अनुभवी अभियंत्यांनी, सर्व आव्हानांवर यशस्वीपणे मात करत, आणि प्रत्येक टप्प्यावर यश गाठत, हा भुयारी मार्गाचा कठीण टप्पा यशस्वी केला आहे. या बोगद्याच्या बांधकामात, 75 टक्के कामगार आजूबाजूच्या गावातील होते. त्यामुळे, या बोगद्याच्या बांधकाम काळात, ह्या परिसरातही सकारात्मक सामाजिक- आर्थिक बदल झाले. टी-49 बोगदा रामबन जिल्हयातील सुंबर ते सीरन गांव ((12.75 किमी) - खारी तालुका असा असून, देशातील सर्वात मोठा वाहतूक बोगदा आहे.
* * *
S.Kakade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1883878)
Visitor Counter : 182