कायदा आणि न्याय मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

बलात्कार पीडितांना आणि पॉक्सो कायद्यांतर्गत पीडितांना जलद न्याय देण्यासाठी 1023 जलदगती विशेष न्यायालये स्थापन करण्यासाठीच्या केंद्र पुरस्कृत योजनेची न्याय विभागाकडून अंमलबजावणी


31/10/2022 पर्यंत, 28 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 733 जलदगती विशेष न्यायालये कार्यरत आहेत

Posted On: 15 DEC 2022 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2022

 

देशभरात स्थापित आणि कार्यरत जलदगती न्यायालये/ नवीन जलदगती न्यायालयांची  संख्या तसेच त्याअंतर्गत देशात गेल्या तीन वर्षांत आणि चालू वर्षातील त्यांच्या अंतर्गत प्रलंबित खटल्यांच्या संख्येचे तपशील उच्च न्यायालयांनी दिलेल्या राज्यनिहाय माहितीनुसार परिशिष्टात दिलेले आहेत, अशी माहिती कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. 

जलदगती न्यायालयांची स्थापना आणि निधीचे वाटप राज्य सरकारांच्या कार्यक्षेत्रात असून संबंधित उच्च न्यायालयांशी सल्लामसलत करून राज्यांच्या गरजेनुसार आणि संसाधनांनुसार अशी न्यायालये स्थापन केली जातात. 14 व्या वित्त आयोगाने 2015-2020 या कालावधीत जघन्य स्वरूपाची विशिष्ट प्रकरणे, स्त्रिया, मुले, ज्येष्ठ नागरिक, अपंग, गंभीर आजारांनी बाधित व्यक्ती इत्यादी आणि मालमत्तेशी संबंधित 5 वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत अशा दिवाणी खटल्यांसाठी एकूण 1800 नवीन जलदगती न्यायालये स्थापन करण्याची शिफारस केली होती. फौजदारी कायदा (सुधारणा) कायदा, 2018 च्या अनुषंगाने, न्याय विभाग बलात्कार आणि पॉक्सो कायद्यातील पीडितांना जलद गतीने न्याय प्रदान करण्यासाठी ऑक्टोबर, 2019 पासून 1023 जलदगती विशेष न्यायालये (FTSC) स्थापन करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजना राबवत आहे. जलदगती विशेष न्यायालये ही योजना सुरुवातीला 1 वर्षासाठी सुरू करण्यात आली होती, ती आता 31 मार्च, 2023 पर्यंत एकूण 1572.86 कोटी रुपये खर्चून सुरू ठेवण्यात आली आहे. या खर्चापैकी 971.70 कोटी रुपये निर्भया फंड अंतर्गत केंद्रीय हिस्सा म्हणून दिले  जाणार आहेत. 31/10/2022 पर्यंतच्या माहितीनुसार , 28 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 733 जलदगती विशेष न्यायालये कार्यरत आहेत.

परिशिष्ट 

नवीन जलदगती न्यायालयांची-(FTCs) ची स्थिती -चालू वर्षासह (राज्ये/ केंद्रशासित प्रदेशानुसार) मागील तीन वर्षातील कार्यशील आणि प्रलंबित प्रकरणे

(ऑक्टोबर, 2022 पर्यंत)

Sl No.

State/UT

Dec, 2019

Dec, 2020

Dec, 2021

October, 2022

Functional Courts

 

 

Cases Pending 

Functional

Courts

 

Cases Pending 

Functional Courts

Cases Pending 

Functional Courts

 

Cases Pending 

1

Andhra Pradesh

21

6763

21

10069

21

10069

22

6877

2

 Andaman & Nicobar island 

 

0

 

0

 

0

 

0

3

Arunachal Pradesh

 

0

 

0

 

0

 

0

4

Assam

19

8108

14

10108

16

9356

15

10551

5

Bihar

57

20774

33

58636

0

69792

0

0

6

Chandigarh

 

 

 

 

 

 

 

 

7

Chhattisgarh

38

6882

23

15310

23

17779

23

5394

8

Dadra & Nagar Haveli

 

0

 

0

 

0

 

0

9

Delhi

10

4210

5

40733

7

48520

20

7068

10

Diu & Daman

 

 

 

 

 

 

 

 

11

Goa

0

0

0

0

0

0

4

2038

12

Gujarat

0

0

0

33560

35

35335

35

4894

13

Haryana

6

924

5

58511

6

65337

6

887

14

Himachal Pradesh

0

0

0

15618

0

5102

3

510

15

Jammu & Kashmir

5

876

1

0

4

0

4

685

16

Jharkhand

0

4632

40

14507

6

19371

34

7969

17

Karnataka

0

0

13

38365

18

39458

0

0

18

Kerala

0

0

23

100479

28

114020

0

0

19

Ladakh

 

0

 

0

 

0

 

0

20

Lakshadweep

 

0

 

0

 

0

 

0

21

Madhya Pradesh

0

0

2

15584

0

25769

0

0

22

Maharashtra

91

107491

116

52079

110

67315

111

152312

23

Manipur

4

210

6

634

6

634

10

1023

24

Meghalaya

0

0

0

0

0

0

0

0

25

Mizoram

2

154

2

0

2

0

2

223

26

Nagaland

0

0

1

66

0

153

0

0

27

Odisha

0

0

0

39670

19

44689

0

0

28

Puducherry

 

0

 

1535

 

1452

 

0

29

Punjab

0

0

7

52198

7

85061

7

245

30

Rajasthan

 

0

 

44222

 

46048

 

0

31

Sikkim

1

6

2

188

2

195

2

13

32

Tamil Nadu

74

6036

73

29970

74

32519

73

107590

33

Telangana

29

9950

29

15469

35

18095

0

0

34

Tripura

11

937

11

2551

11

3604

03

1347

35

Uttar Pradesh

368

405127

389

413176

376

396462

372

1036970

36

Uttarakhand

4

567

4

15119

4

15997

4

838

37

West Bengal

88

49723

87

0

88

1166

88

72560

 

Total

828

633370

907

1078357

898

1173298

838

1419994

 

* * *

S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1883785) Visitor Counter : 161


Read this release in: English , Urdu , Tamil , Telugu