नागरी उड्डाण मंत्रालय
गेल्या सात वर्षांत, देशांत सहा नवीन विमानतळ विकसित करण्यात आले / आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून जाहीर करण्यात आले
Posted On:
15 DEC 2022 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2022
2014 पूर्वी देशांत, 24 आंतरराष्ट्रीय विमानतळ होते. गेल्या सात वर्षांत देशांत आणखी सहा विमानतळ विकसित करण्यात आले / आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून जाहीर करण्यात आले.
या सात वर्षांत, केरळमधील कन्नूर, महाराष्ट्रातील शिर्डी, उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि गोव्यातील मोपा ही चार ग्रीनफिल्ड विमानतळे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून बांधण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, आंध्र प्रदेशातील विजयवाडा आणि तिरुपती या दोन विद्यमान विमानतळांना 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले.
मार्च 1994 मध्ये एअर कॉर्पोरेशन कायदा रद्द केल्यानंतर, भारतीय देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ, नियंत्रणमुक्त करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून, विमान वाहतूक कंपन्यांना सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून देशभरात सेवा देणाऱ्या आणि कार्यान्वयन असणाऱ्या कोणत्याही बाजारपेठा आणि नेटवर्क कंपन्यांची निवड करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे, आता कोणत्या जागी, किती प्रमाणात विमान वाहतूक सेवा द्यायची, याचा निर्णय विमानसेवा कंपन्या घेऊ शकतात. त्या संबंधित स्थळांची मागणी आणि व्यवसायिक व्यवहार्यता यांचा विचार करुन, तेच मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन करुन विमान कंपन्या हा निर्णय घेतात.
त्याशिवाय, या विमानतळांवरुन, आंतरराष्ट्रीय विमान सेवांबाबतही, भारतीय विमान सेवा कंपन्यांना, देशातील कोणत्याही विमानतळावरुन परदेशात विमान सेवा देण्याची मुभा आहे. दोन्ही देशातील, विमान सेवा व्यवस्था लक्षात घेऊन, त्या ही सेवा देऊ शकतात. तसेच, द्वीपक्षीय व्यवस्थेनुसार, परदेशी विमान कंपन्याही, कोणत्याही इच्छित स्थळी सेवा देऊ शकतात.
नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल डॉ. व्ही.के. सिंग यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Kakade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1883772)
Visitor Counter : 225