रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतमाला प्रकल्प

Posted On: 15 DEC 2022 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2022

 

भारतमाला प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विविध श्रेणींच्या 24,800 किमी लांबीच्या रस्त्यांचा तसेच सुमारे 10,000 किमीच्या एनएचडीपी(राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प)  प्रकल्पाचा समावेश आहे. यासाठी रु. 5.35 लाख कोटींच्या खर्चाला मंजूरी मिळाली आहे. आतापर्यंत, 23,500 किमीच्या कामांना मान्यता दिली असून 11,400 किमीची कामे पूर्ण झाली आहेत. उरलेली कामे 2024-25 या आर्थिक वर्षात मार्गी लावण्याचे उद्दीष्ट आहे. 

भारतमाला प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नियोजित आर्थिक कॉरिडॉर आणि किनारी तसेच बंदर यांना जोडणाऱ्या रस्त्यांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:-

Corridor Classification

Length under Phase-I of BM (km.)

Awarded Length (km.)

Constructed Length (km.)

Economic Corridors

12,002

7,029

3,019

Coastal & Port Connectivity roads

1,079

269

90

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Kakade/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1883768) Visitor Counter : 232


Read this release in: English , Urdu , Tamil