दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सी-डीओटीने, डीओटी आणि टीएसडीएसआयच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आयओटी/एम2एम परिषदेचे केले आयोजन.
Posted On:
15 DEC 2022 9:05AM by PIB Mumbai
टेलिमॅटिक्स विकास केन्द्राने (सी-डीओटी) केन्द्र सरकारच्या दूरसंचार विभाग (डीओटी) आणि भारतीय दूरसंचार मानक विकास संस्था (टीएसडीएसआय) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आयओटी/एम2एम परिषदेचे आयोजन केले आहे. याची सुरुवात काल झाली.
प्रमाणित पद्धतीने अंमलबजावणी करत आयओटी/एम2एम परिसंस्थेचा विकास साधणे यावर परिषेदेचा मुख्य भर आहे.
संशोधन आणि विकास, शैक्षणिक, सरकार, उद्योग, स्टार्ट-अप्स, जागतिक दूरसंचार संघटना आणि मानक विकास संस्था यातील आयओटी/एम2एम परिसंस्थेच्या प्रमुख भागधारकांमध्ये व्यापक सहकार्यासाठी एक समन्वयात्मक चौकट विकसित करणे हे परिषदेचे उद्दिष्ट आहे. यामुळे विविध क्षेत्रांतील व्यापक कामकाजासाठी नाविन्यपूर्ण, प्रमाणित आणि आंतरकार्यात्मक आयओटी/एम2एम उपायांचा जलद विकास अधिक सुलभ होईल. 5जी च्या उदयामुळे, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि आयओटी/एम2एम आधारित स्वयंचलित उपायांच्या वाढीला चांगलीच गती मिळाली आहे. यामुळे जग, तंत्रज्ञान क्रांतीचे नवीन युग अनुभवत आहे.
देशभरात स्मार्ट शहरे निर्माण करण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाच्या पार्श्वभूमीवरही या परिषदेला अधिक महत्त्व आहे.
डिजिटल दूरसंचार आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव (दूरसंचार) के राजारामन यांनी कार्यशाळेचे उद्घाटन आणि बीजभाषण केले. ग्रामीण आणि निमशहरी भागातील विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग, स्टार्टअप्स, नवसंशोधक यांनी सर्व-समावेशक तंत्रज्ञान मानकांच्या उत्क्रांतीसाठी सक्रियपणे एकत्र काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
अनेक स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि उद्योग आपले आयओटी/एम2एम संदर्भातील नवोन्मेषी उपायाचे सादरीकरण इथे करत आहेत.
***
SushmaK/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1883658)
Visitor Counter : 187