कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

नागरी सेवा परीक्षा 2022(CSE-2022) पासून नागरी सेवा परीक्षा 2030(CSE-2030) पर्यंत सीएससी (CSE) च्या माध्यमातून दरवर्षी आयएएस अधिकाऱ्यांची थेट नियुक्ती करण्या संदर्भात शिफारस करण्यासाठी एक समिती स्थापन - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 14 DEC 2022 3:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2022

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पीएमओ, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज माहिती दिली की, नागरी सेवा परीक्षा 2022(CSE-2022) ते नागरी सेवा परीक्षा2030(CSE-2030) पर्यंत सीएसइ (CSE)च्या माध्यमातून दरवर्षी थेट आयएएस  अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, सीएसइ 2020(CSE-2020) पासून सीएसइ च्या माध्यमातून आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे  प्रमाण 200 पदापर्यंत वाढवण्यात आले आहे, तर सीएसइ 2022 पासून आयएफएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे  प्रमाण 150 पदापर्यंत वाढवण्यात आले आहे.

Services

Sanctioned Strength

Officers in position

IAS

6789

5317

IPS

4984

4120

IFS

3191

2134

सरकारने, सीएसइ 2021(CSE-2021) पर्यंत नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून (CSE) आयएएस अधिकार्‍यांच्या नियुक्तीची  वार्षिक संख्या 180 पर्यंत वाढवली आहे.

केंद्रीय कर्मचारी योजने (CSS) अंतर्गत भारत सरकारच्या विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये उपसचिव/संचालक/सहसचिव/अतिरिक्त सचिव/सचिवांची पदे भरण्यासाठी सीएसएस (CSS) अंतर्गत येणाऱ्या विविध  सहभागी सेवांच्या अधिकाऱ्यांचा विचार केला जातो. यापैकी जे अधिकारी प्रतिनियुक्तीसाठी पर्याय देतात त्यांचा या पदांवरच्या नियुक्तीसाठी विचार केला जातो.

 

S.Kane/V.Yadav/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1883420) Visitor Counter : 147


Read this release in: English , Urdu , Tamil , Telugu