आयुष मंत्रालय

आयुष औषधांच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या खात्रीसाठी उचललेली पावले

Posted On: 13 DEC 2022 10:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2022

 

औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 आणि त्याअंतर्गत असलेल्या नियम 1945 मध्ये विहित केल्यानुसार, गुणवत्ता नियंत्रणाशी संबंधित कायदेशीर तरतुदींची अंमलबजावणी  आणि आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथिक औषधांचा  परवाना जारी करणे हे  संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारने नियुक्त केलेले राज्य औषध नियंत्रक/राज्य परवाना प्राधिकरण यांच्या अधिकारक्षेत्रात येते. औषधे आणि सौंदर्य प्रसाधने नियम, 1945 मधील नियम 158-B मध्ये  आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथिक औषधांचा  परवाना जारी करण्यासाठी  नियामक मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. औषध आणि सौंदर्य प्रसाधने नियम, 1945 च्या शेड्यूल T आणि शेड्यूल M-I नुसार चांगल्या उत्पादन पद्धती (GMP) चे पालन, संबंधित फार्माकोपियामध्ये दिलेल्या औषधांची गुणवत्ता मानके आणि सुरक्षा आणि परिणामकारकतेच्या पुराव्यासह उत्पादन युनिट्स आणि औषधांच्या परवान्यासाठी विहित आवश्यकतांचे पालन करणे उत्पादकांना बंधनकारक आहे,

आयुष मंत्रालयाने देशातील आयुष औषधांच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या खात्रीसाठी  विविध पावले उचलली आहेत:

i) आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणार्‍या योजना: राष्ट्रीय आयुष मोहिमेअंतर्गत  2014-2021 या कालावधीत इतर सेवांव्यतिरिक्त राज्य सरकारच्या आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथिक फार्मेसीच्या बळकटीकरणासाठी अनुदानही देण्यात आले. सध्या, आयुष औषध गुणवत्ता आणि उत्पादन प्रोत्साहन योजना (ओ जी एस ) साठी केंद्रीय क्षेत्र योजना 2021-2026 वर्षासाठी लागू केली आहे. आयुष ओषधी गुणवत्ता आणि  उत्पादन  संवर्धन योजनेचे घटक खालीलप्रमाणे आहेत;

A. उच्च मानके साध्य करण्यासाठी आयुष फार्मसी आणि औषध चाचणी प्रयोगशाळांचे बळकटीकरण आणि आधुनिकीकरण

B. दिशाभूल करणार्‍या जाहिरातींवर अंकुश ठेवण्यासाठी आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथिक औषधांची फार्माकोव्हिजिलन्स.

C. आयुष औषधांसाठी केंद्रीय आणि राज्य नियामक यंत्रणांचे बळकटीकरण, तांत्रिकदृष्ट्या कुशल मनुष्यबळ आणि  क्षमता निर्माण कार्यक्रम

D. मानके आणि मान्यता यासाठी पाठबळ /  भारतीय मानक ब्युरो  (BIS) भारताचे गुणवत्ता नियंत्रण (QCI) आणि इतर संबंधित वैज्ञानिक संस्था आणि औद्योगिक विकास आणि संशोधन केंद्रांच्या सहकार्याने आयुष उत्पादने आणि सामग्रीचे प्रमाणीकरण,

ii) आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत एक अधीनस्थ कार्यालय असलेल्या भारतीय औषध आणि होमिओपॅथीसाठीच्या  फार्माकोपिया आयोगाने  (PCIM&H), आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी (ASU&H) औषधांसाठी औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 च्या कक्षेत फार्माकोपियल मानके आणि सूत्रीय वैशिष्ट्ये सांगितली आहेत. जे त्यात समाविष्ट असलेल्या औषधांच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यासाठी अधिकृत ज्ञानकोश म्हणून काम करतात. याशिवाय, हा आयोग  एक न्यायासन  या नात्याने औषध चाचणी प्रयोगशाळा म्हणून सरकारी संस्थांकडून औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा आणि नियमांनुसार त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी नमुने प्राप्त करते. आयुर्वेद आणि इतर भारतीय प्रणालींचे औषध मानक आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे  विकसित करण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या  अंतर्गत असलेल्या भारतीय औषध आणि होमिओपॅथीसाठी फार्माकोपिया आयोगाच्या (PCIM&H), गाझियाबाद येथील कार्यालयाने 2021 मध्ये अमेरिकन हर्बल फार्माकोपिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) सह सामंजस्य करार केला आहे. 'एक औषधी वनस्पती एक मानक' ही प्रणाली विकसित करण्यासाठी भारतीय औषधी आणि होमिओपॅथीसाठीचा फार्माकोपिया (औषधी कोश) आयोग- पीसीआयएम ॲण्ड एच तसेच भारतीय फार्माकोपिया आयोग (आयपीसी)  यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

iii) या व्यतिरिक्त, निर्यात सुलभ करण्यासाठी, आयुष मंत्रालय खालील तपशीलांनुसार आयुष उत्पादनांच्या खालील प्रमाणीकरणाला प्रोत्साहन देते:-

  • हर्बल उत्पादनांसाठी जागतिक आरोग्य संघट्नेच्या (डब्लूएचओ) मार्गदर्शक तत्त्वांनुसार फार्मास्युटिकल उत्पादनांचे (सीओपीपी) प्रमाणन.
  • आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करण्याच्या स्थितीनुसार गुणवत्तेचे तृतीय पक्ष मूल्यांकनाच्या आधारे आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी उत्पादनांना आयुष प्रीमियम मार्क देण्यासाठी भारतीय दर्जा परिषदे द्वारे (क्युसीआय) गुणवत्ता प्रमाणपत्र योजना लागू केली जाते.

iv) 27 राज्य औषध चाचणी प्रयोगशाळांना त्यांच्या पायाभूत सुविधा आणि कार्यात्मक क्षमता वाढविण्यासाठी पाठबळ  देण्यात आले आहे. आजपर्यंत 81 प्रयोगशाळांना आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी औषधे आणि कच्च्या मालाच्या गुणवत्तेच्या चाचणीसाठी औषधे आणि सौंदर्य प्रसाधने नियम, 1945 च्या तरतुदींनुसार मान्यता देण्यात आली आहे.

v) आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी (एएसयु ॲण्ड एच) औषधांसाठी आयुष मंत्रालयाच्या केंद्रीय योजनेंतर्गत देशाच्या विविध भागात स्थापन करण्यात आलेल्या फार्मा सह दक्षता केंद्रांनी संबंधित राज्य नियामक प्राधिकरणांना दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचे निरीक्षण आणि अहवाल देणे बंधनकारक आहे. राष्ट्रीय फार्मा सहदक्षता केंद्र (एनपीव्हीसीसी), मध्यस्थ फार्मा सहदक्षता केंद्र (आयपीव्हीसी) आणि पेरिफेरल सहदक्षता केंद्र (पीपीव्हीसी) यांचा समावेश असलेली त्रिस्तरीय रचना स्थापन केली आहे. आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआयआयए) आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी औषधांसाठी राष्ट्रीय फार्मा सहदक्षता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय फार्मा सहदक्षता समन्वय केंद्र (एनपीव्हीसीसी) आहे. आक्षेपार्ह जाहिरातीसंदर्भात राज्य परवाना प्राधिकरणांना पीपीव्हीसी द्वारे नियमित अंतराने माहिती दिली जाते.

एकूण 9 पदे - औषध निरीक्षकांची 4 पदे (प्रत्येक शाखेची 1- आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी); आयुष मंत्रालयातील केंद्रीय आयुष औषध नियंत्रक कार्यालयाच्या स्थापनेसाठी सहाय्यक औषध नियंत्रकाची 4 पदे (आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथीसाठी प्रत्येकी 1) आणि उप औषध नियंत्रकाचे (एएसयु ॲण्ड एच) 1 अशी पदे निर्माण करण्यात आली आहेत. आयुष मंत्रालयाने वर नमूद केलेल्या 9 पदांच्या अतिरिक्त प्रभारासाठी आयुष मंत्रालयातील त्यांच्या सामान्य कर्तव्याव्यतिरिक्त, 4562(ई) दिनांक 27.09.2022 या राजपत्र अधिसूचनेद्वारे कोणताही अतिरिक्त मोबदला न देता ही 9 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आयुष मंत्रालय केंद्रीय लोकसेवा आयोगाशी (युपीएससी) सल्लामसलत करून नियमितपणे केंद्रीय आयुष औषध नियंत्रक कार्यालय स्थापन करण्यासाठी 9 पदे भरण्याची प्रक्रिया करत आहे.

आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Kakade/B.Sontakke/P.Jambhekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1883246) Visitor Counter : 307


Read this release in: English , Urdu , Telugu