नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
सौर आणि अल्ट्रा मेगा सौर ऊर्जा प्रकल्पांची स्थिती
Posted On:
13 DEC 2022 6:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2022
पीएम -कुसुम योजनेंतर्गत एकूण 34422 कोटी रुपये केंद्रीय अर्थ सहाय्याची तरतूद असून ती 31.3.2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.ही योजना मागणीवर आधारित योजना आहे आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त झालेल्या मागणीच्या आधारे या योजनेअंतर्गत सुविधांचे वाटप केले जाते.
सौर पार्क्स आणि अल्ट्रा मेगा सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विकासाच्या योजनेअंतर्गत, 30.11.2022 पर्यंत एकूण 39,285 मेगावॅट क्षमतेच्या एकूण 57 सौर पार्क्सना मंजुरी देण्यात आली आहे.
आतापर्यंत, या पार्क्समध्ये 10,027 मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत, तर काही सौर पार्क त्यांच्या संथ प्रगतीमुळे रद्द करण्यात आले आहेत. मोकळ्या जमिनीचे संपादन; सौर प्रकल्प आणि उर्जा निर्वासन पायाभूत सुविधांमधील न जुळणारा कालावधी; राजस्थान आणि गुजरातमधील माळढोक (जीआयबी) सारखे पर्यावरणीय मुद्दे; कोविड महामारीमुळे अंमलबजावणीची गती बर्याच प्रमाणात मंदावणे इत्यादींसारख्या आव्हानांचा सामनाया योजनेला करावा लागत आहे.
केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Kakade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1883188)