अवजड उद्योग मंत्रालय
फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत 7 डिसेंबर 2022 पर्यंत 7,45,713 इलेक्ट्रिक वाहनांना मागणी प्रोत्साहनाद्वारे सुमारे 3,200 कोटी रूपयांचे साहाय्य
Posted On:
13 DEC 2022 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2022
फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत, 07.12.2022 पर्यंत 7,45,713 इलेक्ट्रिक वाहनांना मागणी प्रोत्साहनाद्वारे सुमारे 3,200 कोटी रूपयांचे साहाय्य दिले गेले आहे. या योजनेअंतर्गत 26 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील शहराअंतर्गत आणि शहरांदरम्यान परिवहन सेवेसाठी अवजड उद्योग मंत्रालयाने 65 शहरे/एसटीयू/सीटीयू/राज्य सरकारांना 6315 ई-बसेस मंजूर केल्या आहेत.
केंद्र सरकारने 1 एप्रिल 2019 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी भारतातील (हायब्रीड आणि) इलेक्ट्रिक वाहने (फेम इंडिया) योजनेचा वेगवान अवलंब आणि उत्पादनाचा टप्पा-II अधिसूचित केला आहे. या टप्प्यासाठी एकूण 10,000 कोटी रूपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केलेली आहे. हा टप्पा प्रामुख्याने सार्वजनिक आणि सामायिक वाहतुकीच्या विद्युतीकरणावर लक्ष केंद्रित करतो आणि 7090 ई-बस, 5 लाख ई-3 चाकी, 55000 ई-4 चाकी प्रवासी कार आणि 10 लाख ई-2 चाकी वाहनांना मागणी प्रोत्साहनाद्वारे पाठबळ देण्याचे या टप्प्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत, इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीदारांना इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी किमतीत आगाऊ कपात करण्याच्या स्वरूपात प्रोत्साहन दिले जाते.
केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Kakade/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1883159)
Visitor Counter : 243