सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

एमएसएमई क्षेत्रात परकीय गुंतवणूक

Posted On: 12 DEC 2022 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 डिसेंबर 2022

 

एफडीआय अर्थात परकीय थेट गुंतवणूक हे एक असे सक्षम धोरण आहे, जे पात्र गुंतवणूकदार संस्थांचे प्रमाण किंवा आकार विचारात न घेता एकसमानपणे लागू आहे. एफडीआयला चालना देण्यासाठी, सरकारने एक गुंतवणूकदार-अनुकूल धोरण लागू केले आहे, ज्यामध्ये काही धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण क्षेत्रे/उपक्रम वगळता क्षेत्रीय कायदे, मार्गदर्शक तत्वे/नियम, सुरक्षा संबंधी परिस्थिती आणि राज्य/स्थानिक/कायदे/नियम यांना आधीन राहून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासह (एमएसएमई ) बहुतांश क्षेत्र/उपक्रम स्वयंचलित मार्गाने 100% एफडीआय साठी खुले आहेत.

या संदर्भात मंत्रालयाने, स्पर्धात्मकता आणि व्यवहार्यतेच्या दृष्टिकोनातून एमएसएमई क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे यावर कोणताही विशिष्ट अभ्यास केलेला नाही.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय देशातील एमएसएमई क्षेत्राचा प्रचार आणि विकास करण्याच्या उद्देशाने विविध योजना आणि कार्यक्रम राबविते.

या योजना/कार्यक्रमांमध्ये एमएसएमई चॅम्पियन्स योजना, सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, सूक्ष्म आणि लघु उद्योग - क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, सरकारने एमएसएमई क्षेत्राला अधिक बळ देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

  1. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांबरोबर आपत्कालीन पत हमी योजने अंतर्गत  येणाऱ्या व्यवसायासाठी 5 लाख कोटी रुपयांपर्यन्त तारण रहीत कर्ज
  2. सेल्फ रिलायंट इंडिया फंडाद्वारे 50,000 कोटी रुपये भांडवल घालणे . या योजनेत भारत सरकारकडून 10,000 कोटी रुपये  कॉर्पस निधीची तरतूद आहे.
  3. एमएसएमईच्या वर्गीकरणासाठी नवीन सुधारित निकष.
  4. व्यवसाय सुलभतेसाठी ''उद्यम नोंदणी'' द्वारे एमएसएमईची नवीन नोंदणी.
  5. 200 कोटी रुपया पर्यंतच्या खरेदीसाठी जागतिक निविदा नाही. 
  6. 2 जुलै, 2021 पासून किरकोळ आणि घाऊक व्यापारांचा एमएसएमईत समावेश 
  7. एमएसएमईच्या स्थितीत सकारात्मक दिशेने बदल झाल्यास 3 वर्षांसाठी बिगर कर लाभांना मुदतवाढ.
  8. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या उद्यम पोर्टल आणि नॅशनल करिअर सर्व्हिसच्या एकत्रीकरणाचा परिणा म्हणून नोंदणीकृत एमएसएमई, एनसीएसवर  नोकरी इच्छुक उमेदवारांचा शोध घेऊ शकतील.

सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानु प्रताप सिंह वर्मा यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

N.Chitale/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1882794) Visitor Counter : 174


Read this release in: Telugu , English , Urdu , Tamil