संरक्षण मंत्रालय

भारताचे पहिले सीडीएस दिवंगत बिपिन रावत यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त, त्यांच्या अर्धपुतळ्याचे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते नवी दिल्लीत अनावरण

Posted On: 10 DEC 2022 6:50PM by PIB Mumbai

 

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स सीडीएस जनरल बिपिन रावत, यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी, नवी दिल्लीत, आज (10 डिसेंबर 2022) युनायटेड सर्व्हिस इन्स्टिटयूशन ऑफ इंडिया इथे त्यांच्या अर्धपुतळ्याचे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी,संरक्षण राज्यमंत्र्यांसह, विद्यमान सीडीएस जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख व्ही. आर. चौधरी, नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि सैन्यदलातील वरिष्ठ तसेच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी, जनरल बिपिन रावत यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देत, त्यांना अभिवादन केले.

सैन्यदले, आणि युएसआय, यांनी, संयुक्तरित्या हाती घेतलेल्या उपक्रमानुसार, या संस्थेतजनरल बिपिन रावत यांच्या नावाने एक उत्कृष्टता अध्यासन आणि बिपिन रावत स्मृती व्याख्यान आयोजित केले जाणार आहेत. त्यांच्या चार दशकांच्या दैदीप्यमान कारकिर्दीत, बिपिन रावत यांना सैन्यदलातील अनेक सन्मान आणि पद्म विभूषणने गौरवण्यात आले होते. ते एक द्रष्टे नेते, बुद्धिमान सैनिक होते. आपल्या व्यावसायिक दृष्टिकोन, तत्वे, कार्याबद्दलची निष्ठा आणि निर्णयक्षमतेसाठी ते ओळखले जात.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1882402) Visitor Counter : 190


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi