अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयवायओएम(IYOM) अर्थात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष आणि मेगा फूड इव्हेंट 2023 शी संबंधित विषयांवर अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे सचिव (FPI) यांची निवासी आयुक्तांबरोबर बैठक

Posted On: 10 DEC 2022 9:13AM by PIB Mumbai

एफपीआय (FPI) अर्थात अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सचिवांनी गुरुवारी 8 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11:00 वाजता निवासी आयुक्तांसोबत बैठक घेतली. प्रस्तावित मेगा फूड इव्हेंटसाठी मंत्रालयाच्या कृती आराखड्याची राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना माहिती देणे आणि सहकार्याच्या संभाव्य क्षेत्रांवर चर्चा करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.

आपल्या मुख्य भाषणादरम्यान, एफपीआय सचिव यांनी निवासी आयुक्तांना (RCs)  माहिती दिली की, हा मेगा इव्हेंट ऑक्टोबर 2023 मध्ये आयोजित केला जाईल आणि मंत्रालयाने यापूर्वी आयोजित केलेल्या कार्यक्रमापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर त्याची कल्पना केली जात आहे. हा कार्यक्रम राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्य / केंद्रशासित प्रदेश-विशिष्ट संधी प्रदर्शित करण्यासाठी, जागतिक आणि स्थानिक व्यावसायिक, पुरवठादार, खरेदीदार आणि सहयोग करणारे तंत्रज्ञान प्रदाते यांच्याशी संवाद साधण्यासाठी आणि अन्न प्रक्रिया आणि अन्न किरकोळ क्षेत्र मूल्य शृंखलामध्ये गुंतवणूक आणि स्रोतांमध्ये स्वारस्य निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. 

सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिप्राय / सूचना शेअर करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यांना या कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी तसेच या मेगा फूड इव्हेंटमध्ये वरिष्ठ धोरण निर्माते, कृषी-खाद्य कंपन्या, अन्नप्रक्रिया उद्योग FPO/ स्वयंसहायता गटांना(SHG) आणि सर्व संबंधित भागधारकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी मंत्रालयाला पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली.

सहभागींना असेही सांगण्यात आले की ‘आंतरराष्ट्रीय भरड धन्य वर्षाचा’ भाग म्हणून, मंत्रालयाकडून भरडधान्य आणि भरडधान्यावर आधारित मूल्यवर्धित उत्पादनांच्या अनेक फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रमांची योजना आखली जात आहे.

सर्व सहभागी निवासी आयुक्तांनी (RCs) वर्ष 2023 मधील सर्व नियोजित उपक्रमांमध्ये आणि मेगा फूड इव्हेंट 2023 दरम्यान अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाला(MoFPI) पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. या संदर्भातल्या काही सूचना/अभिप्रायांमध्ये, मेगा फूड इव्हेंटच्या केंद्रित मोहिमेची गरज तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये भरड धान्यांचे फायदे सांगण्याची गरज, राज्यांच्या राजधानीत नियोजित परिषदा आणि प्रदर्शना व्यतिरिक्त जिल्हास्तरीय शिखर परिषदांचे आयोजन करणे जे आपल्या पारंपारिक पैलूंचे प्रदर्शन करण्यासाठी लहान उद्योजक, अन्नप्रक्रिया उद्योग(FPO), स्वयंसहायता गटांना (SHGs) सहभागी होण्यास मदत करतील; त्याचबरोबर या भव्य इव्हेंटच्या जाहिरातीसाठी पर्यटन उद्योगाशी संभाव्य सहकार्य घेणे या बाबींचा समावेश होता.

या बाबतीत गुंतवणूक सुविधा सेल (इन्व्हेस्ट इंडिया) ला सूचित करण्यात आले आहे की, कार्य योजना लागू करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधावा आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा सक्रिय सहभाग निश्चित करण्यासाठी आवश्यक समर्थन सुनिश्चित करा.

अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे सचिव (FPI) यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भारतीय अन्न प्रक्रिया क्षेत्राचे सामर्थ्य दाखवण्यासाठी मंत्रालयाशी संलग्न होण्यासाठी तसेच मेगा इव्हेंटचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

****

M.jaybhaye/Vikas.Y/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1882305) Visitor Counter : 207


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu