वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाणिज्य विभागाने विशेष आर्थिक क्षेत्रातील युनिट्समधील कर्मचाऱ्यांना 'घरून कार्यालयीन काम करून देण्याच्या' धोरणाचे उदारीकरण करत नियमांमध्ये केल्या सुधारणा


31.12.2023 पर्यंत घरून काम करण्यास परवानगी

एसईझेड युनिटच्या सर्व कर्मचाऱ्यांपैकी 100% पर्यंत काम, घरून करण्यासाठी प्रदान केले जाऊ शकते

Posted On: 09 DEC 2022 6:19PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2022

वाणिज्य विभागाने, विशेष आर्थिक क्षेत्रातील युनिट्ससाठी (एसइझेड ,SEZ) घरून कार्यालयीन काम(वर्क फ्रॉम होम)करण्याच्या धोरणाचे उदारीकरण करत आपल्या नियमांमध्ये आणखी सुधारणा करत एसइझेड युनिट्ससाठी वर्क फ्रॉम होम (WFH) करता यावे यासाठी 14.07.2022 च्या अधिसूचनेद्वारे,नवीन नियम 43A समाविष्ट करत,सुधारणा केली होती. तसेच वाणिज्य विभागाने सर्व विशेष आर्थिक क्षेत्रातील सुधारित नियमांची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी 12.08.2022 च्या निर्देशांनुसार एक मानक कार्यप्रणाली (SOP) देखील जारी केली होती.

नियम 43A च्या अधिसूचनेनंतर आणि 12.08.2022 रोजी निर्देश जारी केल्यानंतर,वाणिज्य विभागाला राष्ट्रीय सामाजिक विज्ञान प्रलेखन  केंद्राकडून (NASSCOM) त्याचबरोबर वर्क फ्रॉम होम सुविधामध्ये आणखी लवचिकता हवी असलेल्या युनिट्सकडून या संदर्भातील मागण्या प्राप्त झाल्या. संबंधित भागधारकांशी सल्लामसलत करून, या प्रकरणात अधिक तपासणी करण्यात आली आणि त्यानुसार, अधिसूचना क्र. द्वारे नियम 43A, यामध्ये जीएसआर(GSR) 868(E) दिनांक 08.12.2022.नुसार नवीन नियम करून बदलण्यात आला आहे.

या अधिसूचनेची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • सर्व भागधारकांशी सल्लामसलत करून वर्क फ्रॉम होम व्यवस्थेचे  लक्षणीयरित्या उदारीकरण केले आहे.
  • पूर्वीच्या परवानग्यांवर आधारित शासन कामकाजाचे रूपांतर सूचना-आधारित शासन कामकाजात करण्यात आले आहे.
  • एसईझेड युनिटच्या सर्व कर्मचाऱ्यांना 100% पर्यंत कार्यालयीन काम घरुन करण्यास परवानगी प्रदान केली जाऊ शकते.
  • 31.12.2023 पर्यंत वर्क फ्रॉम होमला परवानगी.
  • पूर्वीच्या नियमांतर्गत वर्क फ्रॉम होम चा लाभ घेत असलेल्या युनिट्ससाठी, 31.01.2023 पर्यंत ईमेलद्वारे माहिती पाठविली जाऊ शकते.
  • भविष्यात डब्ल्यूएफएच (वर्क फ्रॉम होमची) मागणी करणारी युनिट्स डब्ल्यूएफएच सुरू होण्याच्या तारखेला किंवा त्यापूर्वी एका सूचनेद्वारे ईमेल करू शकतात.

विशेषत: माहिती तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा( IT/ITES)या  क्षेत्रात कोविड महामारीमुळे उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काम करण्याची ही दुहेरी पद्धत एक आदर्श पद्धत बनली होती.माहिती तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा(IT/ITES) उद्योगातील प्रतिनिधींनी वाणिज्य विभागाला (DoC) विशेष आर्थिक झोन (SEZ) मधील युनिट्सना काम करण्याच्या दृष्टीने या दुहेरी पद्धतीचा अवलंब करण्यास आणि एसईझेड युनिट्समधील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची (WFH) सुविधा देऊन सक्षम करण्यासाठी प्रतिनिधित्व केले होते. उद्योगाच्या खऱ्या गरजा लक्षात घेऊन आणि टियर-2 आणि टियर-3 शहरांच्या अर्थव्यवस्थेला अशा प्रकारच्या सुविधा देणे शक्य आहे,ही या लाभांची व्याप्ती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1882205) Visitor Counter : 234