रेल्वे मंत्रालय
2022-23 मध्ये विक्रमी उत्पादन साध्य करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या उत्पादन युनिटचे जलद गतीने प्रयत्न सुरु
या वर्षी नोव्हेंबर 2022 पर्यंत 614 इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हची निर्मिती
लोकोमोटिव्ह उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 25.3% वाढ
Posted On:
08 DEC 2022 4:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2022
वर्ष 2022-23 मध्ये विक्रमी उत्पादन साध्य करण्यासाठी भारतीय रेल्वेची उत्पादन युनिट्स म्हणजे चित्तरंजन येथील चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स (CLW), वाराणसी येथील बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स (BLW), पटियाला येथील पटियाला लोकोमोटिव्ह वर्क्स (PLW) यांचे जलद गतीने प्रयत्न सुरु आहेत.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत 614 इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हची निर्मिती करून भारतीय रेल्वेने याच कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 25.3% वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच काळात 490 इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हची निर्मिती झाली होती.
S.Kakade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1881819)
Visitor Counter : 188