सांस्कृतिक मंत्रालय
पंतप्रधान संग्रहालयात भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या प्रवासावरील पहिल्या लाईट अँड साउंड शो चा शुभारंभ
Posted On:
07 DEC 2022 8:19PM by PIB Mumbai
पंतप्रधान संग्रहालयाच्या लाइट अँड साउंड शोचा पहिला भाग आज नवी दिल्ली येथे प्रदर्शित करण्यात आला.
केंद्रीय संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, अंतराळ विभागाचे सचिव एस. सोमनाथ, एनएमएमएल च्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, एनएमएमएल च्या कार्यकारी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ ए सूर्य प्रकाश आणि अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय नागरिक असलेले विंग कमांडर राकेश शर्मा यावेळी उपस्थित होते.
लाइट अँड साउंड शो पंतप्रधान संग्रहालायामध्ये महत्वाची भर घालणारा कार्यक्रम असून, याचा पहिला भाग स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचा उल्लेखनीय प्रवास सादर करतो.
हा भाग अंदाजे 30 मिनिटांचा असून, सायकलवरून केल्या गेलेल्या उपकरणांच्या वाहतुकीपासून ते आजच्या प्रगत प्रक्षेपण केंद्र आणि अवकाश संशोधन केंद्रांपर्यंतचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे. याच्या संहितेमध्ये भारताच्या उल्लेखनीय अवकाश प्रवासाचे महत्वाचे टप्पे समाविष्ट आहेत.
दुसरा शो, ज्याची यापूर्वीच निवड करण्यात आली आहे, त्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनाम महिला योध्यांचे शौर्य दाखवण्यात आले आहे. फेब्रुवारी 2023 पर्यंत हा शो प्रदर्शनासाठी तयार होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 6.30 ही वेळ, लाइट अँड साउंड शो साठी निश्चित करण्यात आली आहे, ज्यामुळे संग्रहालयाला भेट देणाऱ्या पाहुण्यांना सवलतीच्या कॉम्बो (एकत्रित) तिकीट सुविधेचा लाभ घेता येईल.
***
Sushama K/R Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1881678)
Visitor Counter : 121