भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची आणि पाच राज्यांतील सहा विधानसभा पोटनिवडणुकांची तसेच उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची तयारी

Posted On: 07 DEC 2022 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 डिसेंबर 2022

 

भारतीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची आणि पाच राज्यांतील सहा विधानसभा पोटनिवडणुकांची तसेच उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीच्या तयारीचा आज आढावा घेतला. 116 मतमोजणी केंद्रांवर ही मतमोजणी होणार असून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली  निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे  आणि निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी हा आढावा घेतला.

आयोगाने वेळोवेळी सविस्तर सूचना दिल्या आहेत आणि मतमोजणीसंदर्भातील मानक संचालन पद्धती जारी केली आहे. वर उल्लेख केलेल्या मतदारसंघांतील मतमोजणीसाठी ही प्रक्रिया लागू राहील.

हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची आणि ओडिशा, राजस्थान, बिहार आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एक तर उत्तरप्रदेशातील दोन अशा विधानसभेच्या सहा जागांच्या पोटनिवडणुकांसाठी तसेच उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या एका जागेसाठी 08.12.2022 रोजी (उद्या, गुरूवारी) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.  

सर्व मतमोजणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर आणि काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतमोजणी यंत्रे (इव्हीएम) ठेवली आहेत त्या खोल्यांमध्ये त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. तिथे अंतर्गत भागात केंद्रीय सशस्त्र दल जवान  तैनात आहेत.  या खोल्यांमध्ये 24X7 सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत.

भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर (https://results.eci.gov.in) निकाल जाहीर केले जातील आणि प्रत्येक मतदारसंघात चालु फेरीनुसार कल आणि निकाल वेळोवेळी अपडेट केले जाणार आहेत

गूगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध असलेल्या “Voter Helpline App” मोबाईल अॅपद्वारे कल आणि निकाल उपलब्ध असतील.

संबंधित वेबसाइट/मोबाईल अॅप मतमोजणी केंद्रांमधून निवडणूक अधिकाऱ्यांनी भरलेली माहिती प्रदर्शित करेल. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित मतमोजणी केंद्रांवरून प्रणालीमध्ये भरलेली माहिती निवडणूक आयोग प्रसिद्ध करेल.

 

* * *

N.Chitale/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1881611) Visitor Counter : 164


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu