विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भविष्यातील महामारीचा सामना करण्यासाठी लस विकसित करण्याचा आणि वितरणाचा पथदर्शक आराखडा तयार करण्यासाठी भारत, संशोधन आणि विकासामध्ये लक्षणीय गुंतवणूक करणार असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


“भविष्यातील संसर्गजन्य आजारांसाठीची तयारी: भारत सीइपीआय 100 दिवसांच्या लस आव्हानाला सामोरे जायला सज्ज आहे का:”, या विषयावर जैवतंत्रज्ञान विज्ञान संकुल, फरीदाबाद येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Posted On: 07 DEC 2022 9:27AM by PIB Mumbai

भविष्यातील महामारीचा सामना करण्यासाठी लस विकसित करण्याचा आणि वितरणाचा पथदर्शक आराखडा तयार करण्यासाठी भारत, संशोधन आणि विकासामध्ये लक्षणीय गुंतवणूक करणार असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

“भविष्यातील संसर्गजन्य आजारांसाठीची तयारी: भारत सीइपीआय 100 दिवसांच्या लस आव्हानाला सामोरे जायला सज्ज आहे का:”, या विषयावरील दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनामधील आपल्या संदेशात डॉ. जेतेन्द्र सिंह म्हणाले, कोविड-19 आणि साथ-रोग विज्ञानाच्या मॉडेल्सबद्दलचे निष्कर्ष उघड करण्याचे प्रयत्न अजूनही सुरू असताना, भारत भविष्यातील आव्हानांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या, जैवतंत्रज्ञान विभागाची (DBT) स्वायत्त संस्था असलेल्या फरीदाबाद येथील ‘ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (THSTI)’ द्वारे, 5 आणि 6 डिसेंबर 2022 रोजी संस्थेच्या एनसीआर जैवतंत्रज्ञान विज्ञान क्लस्टरच्या आवारात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

जैवतंत्रज्ञान विभागाने महामारी प्रतिसादात महत्वाची भूमिका बजावली आणि कोविड 19 मुळे उद्भवलेल्या धोक्याला आळा घालण्यासाठी अभूतपूर्व पावले उचलली, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. “जैवतंत्रज्ञान विभागाच्या 14 स्वायत्त संस्थांनी थेट लाभ हस्तांतरणामध्ये (डीबीटी) सक्षम भूमिका बजावली. टीएचएसटीआयच्या प्राथमिक नेतृत्वाखाली विभागाने रूग्ण समूह, बायो-अॅसेसिस्टीम, रोगप्रतिकारक आणि सेल्युलर प्रतिसाद तपासणी, लस विकासासाठी आवश्यक प्राण्यांचा अभ्यास या गोष्टी तातडीने हाती घेतल्या आणि भारतातील पहिली डीएनए आणि प्रोटीन सबयुनिट लस कॉर्बेवॅक्स विकसित करण्यासाठी लस उद्योगाला पाठींबा दिला”.

कोविड-19 ने आपल्याला भविष्यातील कोणत्याही संकटासाठी स्वतःला सज्ज राहण्यासाठी धोक्याचा इशारा दिला आहे, असं सांगत, भविष्यातील तयारीसाठी जैवतंत्रज्ञान विभाग आणि टीएचएसटीआय भारताच्या IndCEPI कार्यक्रमाचे नेतृत्व करत आहेत, याचा डॉ जितेंद्र सिंग यांनी पुनरुच्चार केला.

भविष्यातील संसर्गजन्य रोगांसाठी लस विकासाबाबतच्या महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा करण्यासाठी शिक्षण, उद्योग आणि नियमन क्षेत्रातील नेते आणि तज्ञ या बैठकीत एकत्र आले.

भारताने आपल्यासाठी महत्वाच्या असलेल्या आजारांचा सामना करण्यासाठी पथदर्शक आराखडा आणि लक्ष्य उत्पादनाचे स्वरूप (प्रोफाइल) विकसित करण्याची गरज आहे, यावर जागतिक आरोग्य संघटनेमधील (डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी भर दिला. त्यांनी नमूद केले की डब्ल्यूएचओ ने विषाणू-समूहांना प्राधान्य देऊन, त्यापासून लस विकसित करण्यासाठी त्याची पहिली प्रत (प्रोटोटाइप) निवडण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. लस विकास आणि त्याच्या उपलब्धतेबाबतच्या अधिक चांगल्या दृष्टिकोनासाठी परस्परांना सहयोग, जागतिक स्तरावरील समान नियामक प्रक्रिया आणि सार्वजनिक आरोग्याबाबतचे नैतिक धोरण महत्वाचे होते.  

***

Radhika A /Rajashree A/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1881330) Visitor Counter : 191


Read this release in: English , Urdu , Tamil , Telugu