परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

राजस्थानात उदयपूर इथं भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील पहिल्या शेर्पा बैठकीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारताच्या जी-20 प्राधान्यक्रमांच्या बाबी यासंदर्भातल्या चर्चेनं झाली

Posted On: 05 DEC 2022 10:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 डिसेंबर 2022 

 

भारताच्या जी- 20 अध्यक्ष पदाच्या कार्यकाळातल्या  पहिल्या शेर्पा  बैठकीची सुरुवात आंतरराष्ट्रीय शेर्पा, त्यांची शिष्टमंडळ आणि जी- 20 सदस्यांच्या आमंत्रित आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख, 9 अतिथी देश आणि 14 आंतरराष्ट्रीय संघटनांच्या स्वागताने काल उदयपूर इथं झाली.  बैठकीच्या पहिल्या दिवशी  शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि 2030  च्या विषय पत्रिकेच्या केंद्रस्थानी परिवर्तनशील जीवन याबाबत विविध उपक्रम, देवाणघेवाण आणि माध्यमांशी अनौपचारिक चर्चेन झाली. प्रतिनिधीसाठी नेटवर्किंग कार्यक्रम, वाळवंटी संगीत आणि दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी झालं. 

पहिल्या शेर्पा बैठकीच्या वाटाघाटींना भारताचे जी-20 शेर्पा अमिताभ कांत यांनी घेतलेल्या  13 कार्यरत गटांमध्ये भारताच्या जी 20 प्राधान्यक्रम  आढाव्यानं झाली.

यानंतर तंत्रज्ञानाचे परिवर्तन, अंकेक्षित अर्थव्यवस्थेचे कार्यरत गट आरोग्य आणि शिक्षा याविषयी पहिलं सत्र झालं. उपस्थित प्रतिनिधींनी त्यांच्या देशात विविध क्षेत्रात अंकेक्षणाला गती देण्यासाठी आव्हानांवर चर्चा केली. त्यानंतर जी-२० देशांचे प्रतिनिधी, निमंत्रित पाहुणे आणि आंतरराष्ट्रीय संघटना विविध मार्गांच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचं सामर्थ्य आणि लाभांबाबत मध्यस्थाची भूमिका निभावली. सायबर सुरक्षेचं महत्त्व, समावेशक तंत्रज्ञान सेवा आणि पायाभूत सुविधांसाठी विस्तारित मार्ग आणि इतर संकल्पनांसह डिजिटल कौशल्यावर भर देण्यात आला.

दुसरं सत्र हरीत विकास आणि पर्यावरणासाठी जीवनशैली (LIFE), पर्यावरणीय बदलांबाबत प्रभावी धोरणं यावर झालं. केवळ हरित आणि ऊर्जा संक्रमण सुलभीकरणावर चर्चा झाली. भारताचे जी-२० शेर्पा यांनी शाश्वत विकासाचे उद्दिष्ट (SDGs) गाठण्यासाठी एकत्रित प्रयत्न होण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.

 

* * *

N.Chitale/S.Naik/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1881058) Visitor Counter : 209


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia , Tamil