वस्त्रोद्योग मंत्रालय

मुंबईत 22 ते 24 फेब्रुवारी 2023 दरम्यान टेक्नोटेक्स 2023 चे आयोजन


स्टार्टअप उद्योजकांसाठी 'टेक्नोटेक्स 2023' उत्तम संधी : वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश

Posted On: 05 DEC 2022 8:34PM by PIB Mumbai

मुंबई, 5 डिसेंबर 2022

 

तांत्रिक वस्त्रोद्योगा संदर्भातील भारताचे प्रमुख प्रदर्शन  - ‘टेक्नोटेक्स 2023’’ चे मुंबईत 22 ते 24 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. भारतातील तांत्रिक वस्त्रोद्योगाबाबतचा हा  सर्वात मोठा कार्यक्रम उपस्थितांना, भारतातील आणि जगभरातील आघाडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी , उत्पादक, उद्योग समूह , खरेदी व्यवस्थापक आणि पुरवठादारांना भेटण्यासाठी  प्रवेश आणि नेटवर्किंग संधी प्रदान करण्यावर केंद्रित आहे.हा कार्यक्रम भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान (एनटीटीएम) अंतर्गत फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीच्या (फिक्की) सहकार्याने आयोजित केला आहे.

जगभरात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या  श्रेणीचे प्रतिनिधित्व  करणाऱ्या स्टार्टअप उद्योजकांसाठी टेक्नोटेक्स 2023 उत्तम संधी आहे, असे केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी  टेक्नोटेक्स 2023 साठी आज मुंबईत आयोजित एका विशेष पूर्व कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले. “तांत्रिक वस्त्रोद्योग  क्षेत्रात स्टार्टअपची उच्च क्षमता लक्षात घेऊन,‘टेक्नोटेक्स 2023 हा कार्यक्रम स्टार्टअप उपक्रमांना सक्षम  करण्याच्या अनुषंगाने  चर्चा करण्यावर लक्ष केंद्रित करेल, सर्वोत्तम पद्धतींसंदर्भात माहितीची देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन देईल आणि स्टार्टअप्ससाठी उद्योजकीय व्यवस्था  क्षमता विकसित करेल'', असे त्या म्हणाल्या. भारताने जी -20 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे त्यामुळे अत्यंत योग्य वेळी टेक्नोटेक्स 2023 चे आयोजन  केले जात आहे, असे त्या म्हणाल्या.

वाढत्या जागतिक तांत्रिक वस्त्र  बाजाराच्या क्षमतेचा  फायदा घेण्याचे आवाहन मंत्र्यांनी  उद्योग प्रतिनिधींना केले.  देशांतर्गत वापर आणि निर्यात दोन्ही वेगाने वाढण्याची अपेक्षा असल्याने बळकट जागतिक बाजारपेठ उद्योगांच्या प्रतीक्षेत आहे. ''आपल्याला जागतिक उद्योगांशी दृढ  संबंध निर्माण करणे, देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूक आकर्षित करणे तसेच भारताचे सामर्थ्य , उपक्रम आणि सुविधा यांची जगाला प्रचीती  देणे  हे अतिशय महत्त्वाचे आहे.”, असे त्या म्हणाल्या.

सरकार तांत्रिक वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि या दिशेने पीएलआय  योजना,  राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान यासारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत, अशी माहिती वस्त्रोद्योग राज्यमंत्र्यांनी दिली.

तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटकांपैकी एक आहे आणि आत्मनिर्भर भारत साकारण्यासाठी  असलेले एक उदयोन्मुख क्षेत्र आहे, असे महाराष्ट्राचे  वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1881051) Visitor Counter : 186


Read this release in: Hindi , English , Urdu , Tamil