केंद्रीय लोकसेवा आयोग
शुद्धीपत्रक – उमेदवारांसाठी सूचना
प्रविष्टि तिथि:
05 DEC 2022 4:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2022
संदर्भ : दिल्लीच्या एनसीटी अर्थात राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकारच्या शिक्षण विभागात शैक्षणिक संचालनालयातील उपप्राचार्य पदाच्या एकूण 131 जागा (45 पुरुष आणि 86 महिला)भरण्यासाठी दिनांक 16 जून 2022 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासंदर्भात घटक क्र.09 नुसार 22051009328 या क्रमांकाच्या रिक्त जागांकरिता केंद्रीय लोकसेवा आयोगाने 28 मे 2022 रोजी प्रसिध्द केलेली जाहिरात क्र. 10/2022
एनसीटी दिल्लीच्या राज्य दिव्यांग आयोगाच्या न्यायालयाने 2657/1016/2022/06 या क्रमांकाच्या प्रकरणात दिलेल्या निर्देशांना अनुसरून जीएनसीटी दिल्लीने केलेल्या विनंतीनंतर, आयोगाने खालील सूचना केल्या आहेत:
- दोन्ही हातांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झालेल्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी 1 डिसेंबर 2022 ते 9 डिसेंबर 2022 रोजी दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत विशेष खिडकीची सोय करून देण्यात आली आहे. यानुसार अर्ज भरण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा: https://upsconline.nic.in/
- उपरोल्लेखित कालावधीत केवळ दोन्ही हातांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झालेले उमेदवार अर्ज करू शकतील.
- पात्रता चाचणी आधीच्या वेळापत्रकानुसार 11 डिसेंबर 2022 रोजीच घेतली जाईल. या चाचणीसंबंधीची सर्व तपशीलवार माहिती तसेच अभ्यासक्रम आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- या पदांसाठी आधी दिलेल्या जाहिरातीमधील उर्वरित सर्व नियम तसेच अटी यांच्यात काहीही बदल करण्यात आलेला नाही.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1880959)
आगंतुक पटल : 195