रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मध्य प्रदेशात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 69 च्या ओबेदुल्लागंज ते इटारसी दरम्यान भागाचं बांधकाम आणि सुधारणा

Posted On: 05 DEC 2022 4:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 डिसेंबर 2022

 

मध्य प्रदेशात राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाच्या  तिसऱ्या टप्प्याअंतर्गत बांधण्यात आलेल्या ओबेदुल्लागंज ते इटारसी दरम्यान भागाचं बांधकाम आणि सुधारणा केल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट मालिकेच्या माध्यमातून सांगितलं आहे. 600  कोटी रुपयांच्या  गुंतवणूकीतून हा  46 किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प झाल्याचं त्यांनी सांगितलं.

Image   Image

या विस्तारीकरणामुळे नर्मदापुरम आणि इटारसी या शहरांना मध्य प्रदेशची राजधानी जोडली गेल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन प्रवाशांना भोपाळला जलद पोहोचण्यासाठी मदत होणार असल्याचंही ते म्हणाले.

Image

 

* * *

N.Chitale/S.Naik/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1880952) Visitor Counter : 173


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi