राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ आंध्र प्रदेश सरकारने आयोजित केला नागरी स्वागत समारंभ
Posted On:
04 DEC 2022 3:58PM by PIB Mumbai
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (4 डिसेंबर 2022) विजयवाडा येथे आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या नागरी स्वागत समारंभाला उपस्थित होत्या.
महिलांप्रती संवेदनशीलतेच्या बाबतीत आंध्र प्रदेश हे एक अनुकरणीय राज्य असल्याचे राष्ट्रपती या प्रसंगी म्हणाल्या. त्यांनी ‘मोल्ला-रामायण’ या अप्रतिम महाकाव्याची रचना करणाऱ्या कवयित्री मोल्ला यांचा उल्लेख केला. महिलांच्या प्रगतीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या आणि स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या दुर्गाबाई देशमुख यांचेही त्यांनी स्मरण केले. आंध्र प्रदेशच्या स्नुषा सरोजिनी नायडू यांच्याविषयी बोलताना, महात्मा गांधींच्या 'मीठाच्या सत्याग्रहा'मध्ये सरोजिनी नायडू यांनी प्रमुख भूमिका बजावली असून त्या स्वतंत्र भारतातील कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आंध्र प्रदेशातील लोकांचा सक्रिय सहभाग भारतीय जनतेच्या स्मरणात असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.
भारतातील आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासात आंध्र प्रदेशने आघाडीची भूमिका बजावली आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.
अवकाश विज्ञानात इस्रोचे श्रीहरिकोटा केंद्र नवीन आदर्श प्रस्थापित करत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विशेषत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आंध्र प्रदेशातील लोकांनी भारताचा लौकिक जगभरात वाढवला आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -
***
N.Chtale/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880812)
Visitor Counter : 221