युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
क्रीडापटूंना औषधांची पडताळणी करण्यात मदत करण्यासाठी राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था ॲप विकसित करत आहे
Posted On:
02 DEC 2022 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2022
प्रमुख ठळक मुद्दे:
- समावेशी परिषदेत भारत आणि इतर 20 देशांतील प्रतिनिधींनी उपस्थिती नोंदवली.
- टोकियो 2020 पॅरालिम्पिक उंच उडी पदक विजेता शरद कुमारने अनवधानाने डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोन वर्षांच्या बंदीचा अनुभव सांगितला.
“भारत क्रिडा क्षेत्रात उत्कृष्टतेकडे वेगाने प्रगती करत असताना डोपिंगविरोधी कार्यक्रमाचे सर्व पैलू महत्त्वाचे आहेत. दिव्यांग खेळाडूंसाठीच्या क्रिडाप्रकारासह संपूर्ण भारतीय क्रिडा विश्व उत्तेजक मुक्त बनवण्यासाठी राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था (नाडा) जनजागृती करण्याचे सर्व प्रयत्न करेल." अशी माहिती भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव (क्रीडा) सुजाता चतुर्वेदी यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेतर्फे आयोजित समावेशन परिषदेत मुख्य भाषण करताना दिली. या समावेशन परिषदेत भारत आणि 20 देशांतील सहभागी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खेलो इंडियासारख्या उपक्रमांनी खेळाला चालना दिली आहे. त्यामुळे भारतीय क्रिडा क्षेत्रात प्रवेश करण्याची ही उत्तम वेळ आहे, असे मत क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. “खेळात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करत असताना अँटी-डोपिंगकडे दुर्लक्ष करता येणार नाही. राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी कायदा हे त्या दिशेने एक पाऊल आहे,” असे त्या म्हणाल्या.

संयुक्त राष्ट्रांचे भारतातले निवासी समन्वयक शोम्बी शार्प यांनीही या परिषदेला संबोधित केले.
डोपिंग विरोधी कार्यक्रम सर्वसमावेशक असून दिव्यांग खेळाडू या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी आहेत. दिव्यांग खेळाडू इतरांपेक्षा मागे राहणार नाहीत याची खात्री करण्याच्या दिशेने ही परिषद एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे नाडाच्या महासंचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रितू सैन यांनी सांगितले.
खेळाडूंमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी, क्रिडापटू आणि सहाय्यक कर्मचार्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी तसेच त्यांना लिहून दिलेल्या कोणत्याही प्रकारच्या औषधात प्रतिबंधित पदार्थ आहेत का हे ओळखण्यात मदत व्हावी यासाठी नाडा एक ॲप विकसित करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. भौगोलिकता, भाषा आणि दिंव्यागत्वाच्या अडथळ्यांवर मात करेल असा विश्वसनीय मजकूर विकसित करत असल्याचे त्यांनी सांगितले.

टोकियो 2020 पॅरालिम्पिक उंच उडी पदक विजेता शरद कुमारने अनवधानाने अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्यामुळे झालेल्या दोन वर्षांच्या बंदीचा अनुभव सांगितला. दिव्यांग खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामुळे अनेकांना 'शॉर्ट कट' घेण्यापासून रोखले जाते, असे शरद कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, “ ज्यांची डोपिंग चाचणी सकारात्मक आली आहे अशा खेळाडूंच्या अनुभवातून डोपिंगविरोधी उत्तम धडा घेतला जाऊ शकतो” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या परिषदेसंबंधी माहिती देणाऱ्या लिंक खाली देत आहोत.
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1880292
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1866802
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1880602)
Visitor Counter : 211