रेल्वे मंत्रालय
रेल्वेने मालवाहतुकीद्वारे नोव्हेंबर 2022 पर्यंत मिळवला 105905 कोटी रुपयांचा महसूल
गेल्या वर्षीच्या याच कालावधीत मिळवलेल्या महसुलाच्या(91127कोटी रु) तुलनेत या वर्षी मालवाहतुकीच्या उत्पन्नात 16% वाढ
नोव्हेंबर 22 पर्यंत रेल्वेने 978.72 मेट्रिक टन मालवाहतूक केली- गेल्या वर्षीच्या तुलनेत 8%ची सुधारणा
Posted On:
01 DEC 2022 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2022
2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीने गेल्या वर्षातील याच कालावधीमधील मालवाहतूक आणि उत्पन्नाला मागे टाकले आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये 978.72 मेट्रिक टनांची एकूण मालवाहतूक झाली, गेल्या वर्षी याच कालावधीत ही मालवाहतूक 903.16 मेट्रिक टन होती. त्यामुळे रेल्वेने यावर्षी 105905 कोटी रुपयांचा महसूल मिळवला असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 91127 कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत या वर्षीच्या महसुलात 16% वाढ झाली आहे.
नोव्हेंबर 22 मध्ये 123.9 मेट्रिक टन मालवाहतूक करण्यात आली. गेल्या वर्षी याच महिन्यात 116.9 मेट्रिक टन मालवाहतूक झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या महिन्यात मालवाहतुकीत 5% वाढ आहे. ऑक्टोबर महिन्यात 13560 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मिळालेल्या 12206 कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात महसुलात 11% सुधारणा झाली आहे.
“हंग्री फॉर कार्गो” या मंत्राला अनुसरून भारतीय रेल्वेने आपल्या सेवांच्या पुरवठ्यामध्ये स्पर्धात्मक दरांवर सुधारणा करण्याबरोबरच व्यवसाय सुलभतेमध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे रेल्वेकडे नेहमीच्या आणि नेहमीपेक्षा वेगळ्या अशा दोन्ही मालवाहतुकीचा नवा ओघ वळला आहे. ग्राहककेंद्री दृष्टीकोन आणि तत्पर धोरणाचे पाठबळ असलेल्या व्यवसाय विकास युनिट्सच्या कामामुळे रेल्वेला ही उल्लेखनीय कामगिरी करणे शक्य झाले आहे.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880340)
Visitor Counter : 153