पंतप्रधान कार्यालय
डोनी पोलो विमानतळामुळे अरुणाचल प्रदेशात पर्यटनाला चालना मिळेल अशी आशा पंतप्रधानांकडून व्यक्त
Posted On:
30 NOV 2022 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2022
इटानगरमधील डोनी पोलो विमानतळ सुरु झाल्यामुळे अरुणाचल प्रदेशातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या नयनरम्य दृश्यांचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ट्विटचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले;
"सुंदर दृश्य ! नवीन विमानतळ आणि विमान सेवा सुरु झाल्यामुळे मोठ्या संख्येने लोक अरुणाचल प्रदेशला सहज भेट देऊ शकतील आणि तिथले अगत्यशील आदरातिथ्य अनुभवू शकतील.”
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1880018)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam