नौवहन मंत्रालय
जेएनपीएने प्रमुख बंदरांवरील अधिकाऱ्यांसाठी ‘अभिमुखता कार्यक्रम ' चे यजमानपद भूषवले,या क्षेत्रातील तज्ञ आणि अग्रगण्य विद्यापीठांचे विभाग हा कार्यक्रम आयोजित करत आहेत
Posted On:
29 NOV 2022 7:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2022
भारतात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणने जेएनपीए प्रशिक्षण केंद्रात ‘प्रमुख बंदरांवरील अधिकाऱ्यांसाठी अभिमुखता कार्यक्रम’ आयोजित केला आहे. हा दोन आठवड्यांचा कार्यक्रम 28 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू झाला असून 9 डिसेंबर 2022 पर्यंत सुरु राहील. माजी बंदर महासंचालक आणि भारतीय सागरी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मालिनी शंकर यांनी जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी, अग्रगण्य विद्यापीठांचे तज्ञ आणि देशातील प्रमुख बंदरांमधून सहभागी झालेल्यांच्या उपस्थितीत अभिमुखता कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
जेएनपीए तर्फे प्रमुख बंदर अधिकार्यांसाठी आयोजित अभिमुखता कार्यक्रम हा अशा प्रकारचा पहिला उपक्रम आहे , ज्यात बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील तज्ञांना सर्व अधिकार्यांबरोबर त्यांचे कौशल्य सामायिक करण्यासाठी एकत्र आणले आहे. आपल्या देशातील बंदरांच्या संचलन आणि कार्यपद्धतीला नवे स्वरूप देणे हा यामागचा उद्देश आहे.
आपल्या भाषणात, जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, “सध्याच्या वेगवान कामाच्या वातावरणात सर्वंकष शिक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
दोन आठवड्यांच्या कालावधीत सहभागी झालेल्याना वित्त, परिचालन , डिजिटायझेशन, ड्रेजिंग, बंदर क्षेत्रात खाजगी क्षेत्राचा सहभाग, रणनीती आणि त्याच्या व्यवसाय युनिट संबंधित क्षेत्रांपासून ते प्रकल्पांची ओळख, चांगल्या प्रकल्प कराराची वैशिष्ट्ये आणि नियामक मंजुरींसह पर्यावरण मंजुरी आणि प्रक्रिया, आदर्श बंदर विकासाचे सर्वसमावेशक मूल्यांकन, इत्यादीसह इतर विविध विषयांवर तज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1879849)
Visitor Counter : 201