संरक्षण मंत्रालय

सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये उदार हस्ते योगदान देण्याचे संरक्षण मंत्र्यांचे आवाहन


सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कल्याण ही प्रत्येक नागरिकाची नैतिक आणि सामूहिक जबाबदारी असल्याचे केले प्रतिपादन

Posted On: 29 NOV 2022 3:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2022

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये उदार हस्ते योगदान देण्याचे आवाहन राष्ट्राला केले असून सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांचे कल्याण सुनिश्चित करणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी असल्याचे सांगितले. आज नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण  विभागातर्फे आयोजित सशस्त्र सेना ध्वज दिन सीएसआर बैठकीला ते  संबोधित करत होते. ज्यांच्या शौर्य आणि बलिदानाने देशाचे सार्वभौमत्व आणि  अखंडता यांचे  रक्षण केले आहे त्या सशस्त्र दलातील  सेवानिवृत्त तसेच सेवारत जवानांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली,

स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळात  युद्ध जिंकणे असो किंवा सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा सामना करणे असो, आपल्या जवानांनी सर्व आव्हानांना धैर्याने आणि तत्परतेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये अनेकांनी सर्वोच्च बलिदान दिले तर अनेकांना शारीरिकदृष्ट्या अपंगत्व आले.  त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे आपण पुढे येऊन  आपल्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शक्य तितकी मदत करणे ही आपलीच जबाबदारी आहे. सीमेवर कायम सतर्क राहणाऱ्या आपल्या शूर सैनिकांमुळेच आपण निश्चिंतपणे जीवन व्यतीत करतो तसेच आपले जीवन निर्भयपणे जगतो, असे  राजनाथ सिंह म्हणाले.

देशाच्या शूरवीरांच्या कल्याणासाठी सरकार  वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार करत राजनाथ सिंह म्हणाले की, या दिशेने अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

आपली राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करणार्‍या सैनिकांचे कल्याण ही केवळ सरकारची जबाबदारी असू नये तर ते सर्वांचे कर्तव्य असायला हवे असे राजनाथ सिंह म्हणाले.

दरवर्षी अत्यंत लहान वयात निवृत्त होणाऱ्या सुमारे 60,000 सैनिकांना  खासगी क्षेत्राने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन करून ते म्हणाले की शिस्तीत वाढलेल्या या माजी सैनिकांमध्ये अत्यंत क्लिष्ट तंत्रज्ञान समजून घेण्याची आणि त्याचा कुशलतेने वापर करण्याची क्षमता आहे असे त्यांनी  सांगितले.

या प्रसंगी, संरक्षण मंत्र्यांनी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी एक नवीन संकेतस्थळ  (www.affdf.gov.in) सुरु केले. हे  पोर्टल  परस्परसंवादी आणि वापरण्यास अनुकूल  पोर्टल आहे आणि निधीमध्ये ऑनलाइन योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी विकसित केले आहे.

पार्श्वभूमी

माजी सैनिक कल्याण विभाग  युद्धातील शहीदांच्या  विधवा, त्यांची मुले  आणि दिव्यांग सैनिकांसह माजी सैनिकांच्या  कल्याण आणि पुनर्वसनासाठी काम करत असून त्यांच्या वैयक्तिक गरजांसाठी अनुदान, मुलांच्या शिक्षणासाठी मदत , अंत्यविधीसाठी मदत , वैद्यकीय अनुदान आणि अनाथ/अपंग मुलांना  अनुदानपर आर्थिक सहाय्य पुरवते.  ही मदत सशस्त्र सेना ध्वज दिन निधीतून देण्यात येतेज्यासाठी दरवर्षी 7 डिसेंबर रोजी साजरा केल्या जाणाऱ्या सशस्त्र दल ध्वज दिनी सामान्य नागरिकांकडून  योगदान प्राप्त केले जाते. प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 80G(5)(vi) अंतर्गत या निधीत दिल्या जाणाऱ्या योगदानाला  आयकरातून सूट देण्यात आली आहे.

खालील बँक खात्यांच्या नावे काढलेल्या चेक/डीडी/एनईएफटी/आरटीजीएसद्वारे निधीमध्ये योगदान देता येईल.

S No

Bank Name & Address

Account Number

IFSC Code

1

Punjab National Bank,

Sewa Bhawan Branch,

RK Puram, New Delhi-110066

3083000100179875

F'UNB0308300

2

State Bank of India (Saving A/c)
RK Puram, New Delhi-110066

34420400623

SBIN0001076

3

State Bank of India (Current A/c)
RK Puram, New Delhi-110066

40601079720

SBIN0001076

4

ICICI Bank,

IDA House, Sector-4

RK Puram, New Delhi-110022

182401001380

ICIC0001824

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1879762) Visitor Counter : 208


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu