राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती 29 ते 30 नोव्हेंबर दरम्यान हरियाणा दौऱ्यावर

प्रविष्टि तिथि: 28 NOV 2022 9:30PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 29 ते 30 नोव्हेंबर 2022 या काळात हरियाणाला भेट देणार आहेत.

29 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रपती कुरुक्षेत्र येथे आंतरराष्ट्रीय गीता परिषदेला उपस्थित राहतील.याच वेळेला त्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री स्वास्थ्य सर्वेक्षण योजनेला आरंभ करतील. तसेच सार्वजनिक रस्ते वाहतूक सुविधांसाठी असलेल्या हरियाणा ई तिकीटिंग प्रकल्पाचाही त्या आरंभ करतील. त्या सिरसा येथील वैद्यकीय महाविद्यालयाची  पायाभरणीही करतील.त्याच दिवशी राष्ट्रपती कुरुक्षेत्र एनआयटी मधल्या अठराव्या पदवीदान समारंभाला संबोधित करतील. संध्याकाळी चंदीगडमधील हरियाणा राजभवन येथे राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ हरियाणा सरकारच्या वतीने आयोजित नागरी समारंभाला उपस्थित राहतील.

30 नोव्हेंबर 2022 रोजी दिल्लीला परतण्यापूर्वी राष्ट्रपती आशा कार्यकर्त्या, महिला मुष्टीयोध्या, ऑलिंपिक विजेते आणि इतर खेळाडू तसेच विद्यार्थिनींशी संवाद साधतील.

***

N.Chitale/V.Sahajrao/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1879655) आगंतुक पटल : 216
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi