माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘नर्गिसी’ या डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तीच्या संघर्षावरील इराणी चित्रपटाने 53 व्या इफ्फीमध्ये जिंकला आयसीएफटी -युनेस्कोचा गांधी पदक पुरस्कार


‘डाऊन सिंड्रोम’ असलेले लोक हे देवदूत असतात, त्यांच्या आयुष्याविषयी अनेक सुंदर कथा असतात, त्या ऐकल्या पाहिजेत: दिग्दर्शक पायम इस्कंदरी

Posted On: 28 NOV 2022 8:57PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 28 नोव्‍हेंबर 2022

 

दिग्दर्शक पायम एस्कंदरी यांचा इराणी चित्रपट 'नर्गिसी'ने 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  आयसीएफटी -यूनेस्कोचे गांधी पदक जिंकले आहे, महात्मा गांधींच्या शांतता, सहिष्णुता आणि अहिंसेचे आदर्श प्रतिबिंबित करणाऱ्या या चित्रपटाची यासाठी निवड करण्यात आली आहे.

डाऊन सिंड्रोम असलेल्या एका व्यक्तीची आणि त्यामुळे त्याच्या जीवनात निर्माण झालेले ओझे आणि त्याचे परिणाम याची कथा या चित्रपटात आहे. करुणा आणि मार्दव हे दोन गुण या पुरस्कार विजेत्या चित्रपटात दाखवले आहेत.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दिग्दर्शक पायम एस्कंदरी यांनी एका आभासी संदेशाद्वारे, इफ्फीच्या ज्यूरी सदस्यांचे आभार मानले. “हा पुरस्कार मिळणे म्हणजे मोठा सन्मान आहे. हा चित्रपट मी निर्माण करुन शकेन, असा विश्वास ज्यांनी माझ्यावर ठेवला, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. विशेषतः माझे कुटुंब- माझी प्रिय पत्नी आणि ‘नर्गिसी’या चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांना धन्यवाद!”

डाऊन सिंड्रोम हा आजार असलेले लोक, देवदूत असतात, असा मला विश्वास आहे. त्यांच्याकडे सांगण्यासारख्या अनेक कथा असतात, त्या कथा आपण ऐकल्या पाहिजेत, असे ते पुढे म्हणाले.

यावर्षी, जगभरातल्या नऊ चित्रपटांची, आयसीएफटी -यूनेस्कोचे गांधी पदक पुरस्कार स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत असलेले चित्रपट खालीलप्रमाणे:

  • दोन बहिणींची कथा (बांगलादेश | २०२२)
  • भाग्य (ताजिकिस्तान | 2022)
  • आई (बल्गेरिया | 2022)
  • नानू कुसुमा (भारत | २०२२)
  • नर्गिसी (इराण | २०२१)
  • पालोमा (ब्राझील, पोर्तुगाल | 2022)
  • सौदी वेल्लाक्का (भारत | २०२२)
  • द काश्मीर फाइल्स (भारत | 2021)
  • व्हाईट डॉग (कॅनडा | २०२२)

दरवर्षी इफ्फी, आयसीएफटी पॅरिस आणि युनेस्को एकत्र येऊन एका चित्रपटाला गांधी पदक देतात. आयसीएफटी-युनेस्को गांधी पुरस्कारासाठी स्पर्धा करणारे चित्रपट प्रथम इफ्फी मध्ये प्रदर्शित केले जातात आणि नंतर, आयसीएफटी ज्युरी युनेस्कोच्या आदर्शांवर आधारित चित्रपटांचे मूल्यांकन करते.

1994 साली, युनेस्कोने महात्मा गांधींच्या 125 व्या जयंतीनिमित्त हे गांधी स्मृति पदक जाहीर केले. तेव्हापासून दरवर्षी ICFT UNESCO गांधी पुरस्कार महात्मा गांधींच्या शांतता, सहिष्णुता आणि अहिंसेचे आदर्श प्रतिबिंबित करणाऱ्या चित्रपटाला दिला जातो.

 

चित्रपटाबद्दल: नर्गिसी

इराण | 2021 | पर्शियन | 84 मिनिटे | रंगीत

 

कलाकार आणि तंत्रज्ञ :

दिग्दर्शक आणि पटकथा लेखक: पायम इसकंदरी

निर्माता: शहाब होसेनी

डीओपी: मोहम्मद नामदार

कलाकार: हुसेन इसकंदरी, शहाब होसेनी, गझल नजर

 

कथासार :

या चित्रपटात डाऊन सिंड्रोम असलेल्या माणसाच्या आयुष्यातील संघर्षाचे चित्रण केले आहे. त्याची  ज्याची सर्वात मोठी इच्छा स्वत:साठी प्रेम शोधणे आणि लग्न करणे ही आहे. त्या शोधात तो काहीही करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, दुर्दैवाने, त्याला असे दिसते की सध्याच्या व्यवहारी जगात त्याला आणि त्याच्या प्रेमाला काहीही स्थान नाही. मात्र, एका भेटवस्तूने, त्याचे निराश आयुष्य पूर्णपणे बदलून जाते.

दिग्दर्शकाविषयी :

पायम एस्कंदरी हे एक तरुण इराणी दिग्दर्शक आहेत.  त्यांच्या ' नर्गिसी', 'द गुड, द बॅड, द कॉर्नी' (2017) आणि 'मोहे' (2016) या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. त्यांची  अभिनेता आणि लेखक अशीही त्यांची ओळख आहे. 


* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1879648) Visitor Counter : 201


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu