ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

41 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात 'सरस' च्या विक्रीने गाठला विक्रमी उच्चांक, 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त केला व्यवसाय


26 राज्यांतील 300 हून अधिक कारागिरांनी सरस (SARAS) आजिविका प्रदर्शनात मांडली त्यांची उत्पादने

Posted On: 27 NOV 2022 8:57PM by PIB Mumbai

 

सरस आजिविका प्रदर्शन 2022 ची आज सांगता झाली. या प्रदर्शनाने गेल्या 14 दिवसांत 6 कोटी पेक्षा जास्त रुपयांच्या व्यावसायिक उलाढालीसह आपले आधीचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले.  ग्रामीण भारतातील दुर्गम भागातील उत्कृष्ट अशी हस्तकला आणि हातमाग उत्पादने, सरस आजिविका प्रदर्शन 2022 मध्ये विक्रीसाठी मांडण्यात आली होती. हे प्रदर्शन, ग्रामीण विकास मंत्रालय आणि राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था (NIRDPR) यांनी नवी दिल्लीच्या  प्रगती मैदानात आयोजित 41 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (IITF) भरवले होते.

प्रदर्शनात सहभागी 300 हून अधिक कारागिरांनी सुमारे 150 स्टॉल्सद्वारे त्यांची उत्पादने विक्रीसाठी ठेवली होती.  या स्टॉल्समध्ये 26 राज्यांमधील स्वयं-सहायता गटातील सुमारे 300 महिलांनी, देशभरातील विविध ग्रामीण भागातील हस्तकला आणि  हातमाग उत्पादने, तसेच नैसर्गिक खाद्यपदार्थ मांडले होते.

प्रगती मैदानावरील व्यापार मेळाव्यात, मोठ्या संख्येनं लोकांनी सरस आजिविका प्रदर्शनाला भेट दिली.  सजवलेले स्टॉल, विविध संकल्पनांवर बेतलेली नेत्रदीपक दालने, आणि संध्याकाळी आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, यामुळे मेळाव्यासाठी येणाऱ्यांना  सरस प्रदर्शनाला भेट देण्यावाचून राहवत नव्हतं. 

'परंपरा, कला, कारागिरी आणि संस्कृती' या संकल्पनेवर वर केंद्रित असलेलं प्रसिद्ध असं सरस आजिविका प्रदर्शनहा सरकारी उपक्रमांपैकी एक प्रतिष्ठित असा उपक्रम आहे.  हा उपक्रम  सर्वोत्तम सांस्कृतिक वारसा तर  निर्माण करतोच, सोबतच ग्रामीण महिलांच्या उद्यमशीलतेची गाथा  राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावरुन सर्वांसमोर कथन करतो.

***

S.Patil/A.Save/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1879430) Visitor Counter : 203


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi