माहिती आणि प्रसारण मंत्रालय

53व्या इफ्फीमध्ये ‘दिव्यांगजन’ विभागात अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द स्टोरीटेलर’ या चित्रपटाचा प्रीमियर सादर करण्यात आला


समाजातील सर्व घटकांना चित्रपट पाहण्याचा आनंद घेता आला पाहिजे – नागराज मंजुळे

Posted On: 26 NOV 2022 7:50PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 26 नोव्‍हेंबर 2022

 

इफ्फी-53 हा प्रत्येकासाठी आयोजित केलेला सोहोळा आहे. चित्रपटाविषयी प्रेम असलेल्या विशेष प्रकारे सक्षम व्यक्तींना देखील चित्रपटांचा आनंद घेता यावा यासाठी तसेच सर्वसमावेशकतेच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षीच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.

गोवा येथील राज्य दिव्यांगजन आयोगाचे सचिव तहा हझिक दिव्यांग व्यक्तींसोबत महोत्सवाच्या ठिकाणी असताना

आज महोत्सवाच्या  ‘दिव्यांगजन’ विभागात अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द स्टोरीटेलर’ या चित्रपटाचा प्रीमियर सादर करण्यात आला. यासाठी आवाजाच्या सहाय्याने कथेचे वर्णन आणि अनेक भाषांमधील वाचनीय संवाद यांचा समावेश असलेल्या दृक्श्राव्य पद्धतीच्या विशेष  सादरीकरणाची मदत घेण्यात आली.

एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र भाकर यांनी यावेळी उपस्थित असलेले चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सत्कार केला.एनएफडीसीचे महासंचालक म्हणाले की, वेगळ्या शैलीतील चित्रपटांसह नव्या उपक्रमांची सुरुवात केल्यामुळे यावर्षीचा इफ्फी महोत्सव अद्वितीय ठरला आहे.हा चित्रपट महोत्सव सर्वांना आनंद घेण्याजोग्या पद्धतीने आयोजित करावा अशी विशेष सूचना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली आहे अशी माहिती रवींद्र भाकर यांनी यावेळी दिली. समाजातील सर्व घटकांना चित्रपट पाहण्याचा आनंद घेता आला पाहिजे अशी इच्छा नागराज मंजुळे  यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

एनएफडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या हस्ते नागराज मंजुळे यांचा सत्कार

गोवा येथील राज्य दिव्यांगजन आयोगाचे सचिव तहा हझिक हे देखील यावेळी उपस्थित होते. एनएफडीसी आणि इफ्फी यांनी दिव्यांग व्यक्तींकरिता दोन चित्रपटांचे सादरीकरण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. “जेव्हा कोणालाही एखादा चित्रपट श्राव्य वर्णनासह आहे की नाही याची चिंताच करावी लागणार नाही अशा उज्ज्वल भविष्याची आम्ही आशा करतो आहोत,” ते पुढे म्हणाले.

यावर्षी दिव्यांग व्यक्तींसाठी निर्माण केलेला विशेष विभाग म्हणजे इफ्फीच्या आयोजकांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला चित्रपट पाहण्यासाठी समाविष्ट करून घेण्याच्या आणि प्रत्येकाला चित्रपट उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उचललेले पुढचे पाऊल आहे. या विभागात चित्रपट प्रदर्शन आणि त्या ठिकाणी असलेल्या पायाभूत सुविधा तसेच व्यवस्थापन यांच्या स्वरूपाच्या बाबतीत दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेल्या विशेष व्यवस्था लक्षात घेऊन विशेष प्रकारे सक्षम प्रेक्षकांसाठी समर्पित सादरीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या विभागातील चित्रपटांमध्ये अनेक भाषांमधील वाचनीय संवाद तसेच आवाजाच्या सहाय्याने कथेचे वर्णन समाविष्ट करण्यात आले आहे. चित्रपटात दिसणाऱ्या कथेच्या वर्णनाची माहिती देणारे श्राव्य वर्णनांचे वेगळे ऑडियो ट्रॅक तयार करण्यात आले आहेत.प्रेक्षकांना ते ऐकता येतील आणि आतापर्यंत दिव्यांग व्यक्तींना चित्रपट समजून घेण्यात ज्या अडचणी येत होत्या त्या न येता त्यांना चित्रपटाचा आनंद घेता येईल. द स्टोरीटेलर शिवाय रिचर्ड अॅटनबरो यांचा ऑस्कर विजेता ‘गांधी’ हा चित्रपट देखील श्राव्य वर्णने आणि सबटायटल्ससह दृक्श्राव्य सुविधायुक्त करण्यात आला असून यावर्षीच्या इफ्फीमध्ये त्याचे सादरीकरण होणार आहे.  

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/02CZQZ.jpg

 

द स्टोरीटेलर या चित्रपटाविषयी माहिती:

तारिणी रंजन बंदोपाध्याय हा एक बेछुट कथाकार, कोणत्याही एका नोकरीत टिकून राहत नाही. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने 32 नोकऱ्या बदलल्या आहेत. आता कोलकाता येथे स्थायिक असलेला 60 वर्षे वयाचा हा निवृत्त विधुर, त्याची पत्नी अनुराधा जिवंत असताना तिला हव्या त्या ठिकाणी फिरायला घेऊन जाण्यासाठी वेळ न काढू शकल्याबद्दलची एकमेव खंत मनात बाळगून असतो. मात्र, आता अचानक, नोकरी नसताना, जगातील कोणाहीपेक्षा अधिक वेळ त्याच्याकडे उपलब्ध आहे, पण त्याचे सुहृद मात्र त्याच्याजवळ नाहीत याची जाणीव त्याला होते. हा चित्रपट सत्यजित रे यांच्या ‘गोलपो बोलीय तारिणी खुरो’ या कथेवर आधारित आहे.

संदर्भ: https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1877340

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1879175) Visitor Counter : 166