ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयात संविधान दियानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
26 NOV 2022 11:25AM by PIB Mumbai
ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाने संविधान दिनानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
हिंदी आणि इंग्रजीमध्ये उद्देशिका वाचनाने या कार्यक्रमांची सुरुवात झाली.
या वर्षीच्या संविधान दिनाच्या संकल्पनेवर “भारत – लोकशाहीची जननी/भारत लोकतंत्र की जननी” आधारित घोषवाक्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेनंतर, ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाच्या अधिकार्यांनी भारतीय संविधानाविषयी अधिकार्यांशी परस्पर संवादात्मक चर्चा केली.
ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाने भारत आणि भारतीय संविधानावर आधारित प्रश्नमंजुषेचे देखील आयोजन केले होते. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाच्या संपूर्ण परिसरात उंच कट आऊट्स आणि पोस्टर्स ठळकपणे प्रदर्शित करण्यात आले आहेत.


***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1879028)