माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

“भूतकाळाशी वर्तमानकाळ कसा जुळवून घेतो हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे”: दिग्दर्शक अँड्रिया ब्रागा


कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या विषारी द्रव्यांची आणि कीटकनाशकांची समस्या ही ‘सेल्फ डिफेन्स’ या स्पॅनिश चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे

गोवा/मुंबई, 25 नोव्‍हेंबर 2022

 

गोवा येथे सुरु असलेल्या 53व्या इफ्फी मध्ये ‘इफ्फी टेबल टॉक्स’ या चर्चात्मक कार्यक्रमात बोलताना ‘सेल्फ डिफेन्स’ चित्रपटाचे कलाकार आणि तंत्रज्ञ

गोवा येथे सुरु असलेल्या 53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘इफ्फी टेबल टॉक्स’ या चर्चात्मक कार्यक्रमात ‘सेल्फ डिफेन्स’ या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथाकार अँड्रिया ब्रागा म्हणाले, “आपल्या कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या विषारी द्रव्यांची आणि कीटकनाशकांची समस्या ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना म्हणजे आपल्या काळाचे प्रतिबिंब आहे.”

दिग्दर्शक अँड्रिया ब्रागा इफ्फी टेबल टॉक्स’ या चर्चात्मक कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना

या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणारे अँड्रिया ब्रागा यांनी चित्रीकरणाचा अनुभव देखील प्रेक्षकांशी सामायिक केला. ते म्हणाले की संपूर्ण लांबीची फिचर फिल्म चित्रित करणे हे लघुपटाच्या चित्रिकरणापेक्षा फारसे वेगळे नसते. “चित्रिकरणासाठी लागणारी साधने तसेच तंत्रज्ञांच्या व्यावसायिकतेमध्ये खूप सुधारणा झाली असली तरी दिग्दर्शक म्हणून जेव्हा एखादा प्रकल्प माझ्याकडे येतो तेव्हा त्या कथेला न्याय देणे माझ्यासाठी महत्त्वाचे ठरते.”

या चित्रपटाचे संकलक मॉरिसीओ हालेक यांनी त्यांचा अनुभव सामायिक करताना प्रेक्षकांना सांगितले, “आमच्यात मैत्रीचे नाते असल्यामुळे या चित्रपट निर्मितीच्या प्रकल्पावर काम करण्याचा अनुभव अत्यंत चांगला होता. भारतात आम्ही प्रथमच चित्रपट सादर करत आहोत. आणि या चित्रपटाला फारच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

https://iffigoa.org/wp-content/uploads/2022/11/Self-Defense.jpg

‘सेल्फ डिफेन्स’ या चित्रपटातील दृश्य

‘गोवा येथे सुरु असलेल्या 53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपट’ या विभागात सेल्फ डिफेन्स’ या स्पॅनिश चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले.पुढच्या पिढीतील चित्रपट निर्माते पडद्यावर कशा प्रकारे व्यक्त होतात याचे उदाहरण दाखविणाऱ्या पदार्पणातील दिग्दर्शकीय आविष्काराच्या या विभागात एकूण 7 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये पारितोषिकासाठी चुरशीची स्पर्धा आहे.

 

चित्रपटाची संक्षिप्त कथा

स्वत: च्या  भूतकाळात काही न सुटलेल्या समस्या असलेला एडवार्डो हा वकील खुनांच्या मालिकेच्या तपासाच्या संदर्भात आपल्या मूळ शहरात परतण्याचा निर्णय घेतो. काही जुने मित्र तसेच पॉला आणि शहराचा आयुक्त रामिरो हे जोडपे त्याचे स्वागत करतात. गुन्ह्याचा तपास जसजसा पुढे सरकतो तसतसे त्या शहरात अत्यंत दरिद्री अवस्थेत राहणाऱ्या स्थानिकांच्या जीवाची किंमत न करता कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या गैरवापरावर आधारलेली भ्रष्टाचारी यंत्रणा उघड होऊ लागते. या गौप्यस्फोटाने हादरलेला एडवार्डो परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. अर्थात असा तो एकटाच नाही, त्याचे जिथे लक्ष जाते तिथे सर्वत्र अशा उध्वस्त जीवांच्या कहाण्या त्याला दिसतात.

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane

 

Follow us on social media:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1878977) Visitor Counter : 223


Read this release in: Hindi , Tamil , Telugu , Urdu , English