सांस्कृतिक मंत्रालय

संगीत नाटक अकादमीने 2019, 2020 आणि 2021 या वर्षांसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची केली घोषणा 


पुरस्कारासाठी 128 कलाकारांची निवड

कला क्षेत्रातील दहा नामवंत व्यक्तींची अकादमी सहध्यायी म्हणून निवड करण्यात आली आहे

Posted On: 25 NOV 2022 8:05PM by PIB Mumbai

 

संगीत नाटक अकादमीच्या  सर्वसाधारण परिषदेच्या नवी दिल्ली, येथील संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील राष्ट्रीय अकादमीने  6 ते 8 नोव्हेंबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत कला क्षेत्रातील दहा  नामवंत व्यक्तींची अकादमीचे  सहध्यायी (फेलो )म्हणून एकमताने निवड केली.

अकादमीची शिष्यवृत्ती  हा सर्वात प्रतिष्ठित आणि दुर्मिळ असा सन्मान आहे जो  एकावेळी केवळ 40  गुणवंतांना दिला जातो. आता दहा  नवीन सहाध्यायींसह  संगीत नाटक अकादमी मधल्या एकूण सहध्यायीची संख्या 39 झाली आहे.

सर्वसाधारण परिषदेने 2019, 2020 आणि 2021 या वर्षांसाठी संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक/लोक/आदिवासी संगीत/नृत्य/नाट्य, कठपुतली  आणि संगीत नाटकासाठी परफॉर्मिंग आर्ट्समधील एकूण योगदान/शिष्यवृत्ती या क्षेत्रातील एकशे अठ्ठावीस (128) कलाकारांची निवड केली. या एकशे अठ्ठावीस (128) कलाकारांमध्ये तीन संयुक्त पुरस्कारांचा समावेश आहे.

हे नामवंत कलाकार हिंदुस्थानी आणि कर्नाटक अशा दोन्ही प्रकारच्या गायन - संगीतासारख्या परफॉर्मिंग कलांच्या क्षेत्रातील आहेत. बासरी, सतार आणि मृदंगमसह हिंदुस्तानी आणि कर्नाटक दोन्ही वाद्य संगीत; सुगम संगीत तसेच हरिकथा यांचा यात समावेश आहे.  भरतनाट्यम, कथ्थक, कथकली, कुचीपुडी, ओडिसी, सत्रिय, मोहिनीअट्टम तसेच समकालीन नृत्य; रंगभूमीवरील विविध प्रकारचे नैपुण्य  इत्यादी भारतीय नृत्यशैलीतील प्रमुख प्रकारांचा यात अंतर्भाव आहे.

अकादमी  सहाध्यायींच्या पुरस्काराचे स्वरूप 3,00,000/-रुपये  ( तीन लाख रुपये) असे आहे तर अकादमी पुरस्कारामध्ये ताम्रपत्र , शाल आणि  1,00,000/- रुपये ( एक लाख रुपये ) असे पुरस्काराचे स्वरूप असते.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील.

पुरस्कार विजेत्यांच्या संपूर्ण यादीसाठी येथे क्लिक करा.

***

S.Kane/B.Sontakke/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1878946) Visitor Counter : 198