माहिती आणि प्रसारण मंत्रालय
महोत्सवाच्या मध्यकाळात सादर होणारा फिक्सेशन हा चित्रपट सिग्मंड फ्रॉईड आणि कोरियातील अतिवास्तववादी चित्रपटांकडून प्रेरणा घेऊन तयार केला आहे : दिग्दर्शक मर्सिडीज ब्रायस मॉर्गन
गोवा/मुंबई, 25 नोव्हेंबर 2022
53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मध्यकाळात दिग्दर्शक मर्सिडीज ब्रायस मॉर्गन यांच्या दिग्दर्शन क्षेत्रातील चैतन्यपूर्ण पदार्पणाचा चित्रपट असलेल्या फिक्सेशन या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय प्रीमियर सादर होणार आहे. अतिवास्तववादी सायकोलॉजिकल भयपट प्रकारातील हा चित्रपट समाजातील वास्तव आणि त्यातील गैरवर्तन करणाऱ्याच्या दडपशाही सामर्थ्याच्या संरचना आणि त्यातून होणारे पिडीताचे शोषण उघड करतो.

इफ्फीच्या निमित्ताने पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘इफ्फी टेबल टॉक्स’ या चर्चात्मक कार्यक्रमात प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तसेच इतर प्रतिनिधींशी बोलताना दिग्दर्शक मर्सिडीज ब्रायस मॉर्गन म्हणाल्या त्यांचा चित्रपट सिग्मंड फ्रॉईड आणि त्याचा सुप्रसिद्ध चित्रपट डोराज केस स्टडी यांच्याकडून प्रेरणा घेऊन तयार केला आहे. अमेरिकेत तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये फारसा अतिवास्तववाद पाहायला मिळत नसल्याने अतिवास्तववादी प्रकारचा फिक्सेशन हा चित्रपट युरोप तसेच कोरियातील चित्रपटांवरून प्रेरित आहे असे त्यांनी पुढे सांगितले.

चित्रपटाच्या उत्पत्तीबद्दल अधिक माहिती देताना दिग्दर्शक म्हणाल्या की यातील कथा त्यांच्या स्वतःच्या तसेच त्यांच्या माहितीतील अनेक महिलांच्या बाबतीत अधिक व्यक्तिगत आहे. “मी अशा एका अत्यंत छोट्या शहरात लहानाची मोठी झाले जिथे लोक एकमेकांपासून फटकून असलेल्या ठिकाणी राहतात आणि तिथे तुम्ही अत्यंत कमी लोकांना ओळखता. अशा ठिकाणी जेव्हा कोणी तुम्हाला सांगतात की ही गोष्ट खरी आहे तेव्हा ती खरंच खरी आहे की खोटी हे तुम्हाला समजूच शकत नाही. तुम्हांला त्या वेळी त्याच सत्यतेच्या पातळीवर अडकून पडावे लागते. आपल्याला निश्चित माहिती नसलेल्या गोष्टींवर आपण संशय घेतो आणि स्वतःबाबत तसेच आजूबाजूच्या लोकांबाबत प्रश्न उपस्थित करायला सुरुवात करतो. एक चित्रपट निर्माती म्हणून मला आपल्या प्रेक्षकांना अशा अतिवास्तववादी अनुभव द्यायचा होता,” त्यांनी सांगितले.
चित्रपटाचे मुख्य निर्माते मॅक्स टॉपलीन देखील या संवादात सहभागी झाले होते. ते म्हणाले की प्रयोगशील चित्रपट आणि चांगली कमाई करणारा हॉलीवुडमधील सुप्रसिध्द चित्रपट यांचा उत्तम मिलाफ फिक्सेशन या चित्रपटात पाहायला मिळतो. त्याचबरोबर, त्यात बहुजनांची गर्दी खेचणारे व्यावसायिक घटक देखील आहेत. दुर्लक्ष करता येणार नाही अशी उत्सुकता, दृश्य उत्तेजन, श्राव्य उत्तेजन आणि कलाकारांची उत्तम कामगिरी या चित्रपटात दिसते आहे,” त्यांनी स्पष्ट केले.
चित्रपटाच्या निर्मात्या कतरिना कुड्लिक आणि माया हेबल यांनी देखील या चर्चात्मक कार्यक्रमात भाग घेतला.
चित्रपटाची संक्षिप्त कथा
एका वेगळ्याच प्रकारच्या हत्येच्या खटल्यात एका तरुणीला शिक्षा होण्यापूर्वी तिला मानसिक पातळीवरील मूल्यमापनाला तोंड द्यावे लागते. यासाठीच्या चाचण्या जसजशा अधिक व्यक्तिगत आणि भीतीदायक होत जातात तसतशी ती तिच्या डॉक्टरांच्या खऱ्या हेतूबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात करते. मॅडी हासन हिने या चित्रपटात डोरा नावाच्या तरुण महिलेची भूमिका केली आहे. या महिलेला आठवत नसलेल्या गुन्ह्याच्या आरोपाखाली तिला अपारंपरिक न्यायसंस्थेसमोर सादर करण्यात येते. सतत अंमली पदार्थ देऊन आणि कठोर मानसिक चाचण्यांच्या मालिकेला तोंड द्यायला लावून डोराला तिच्या गूढ बंधकांकडून तिला एका न आठवणाऱ्या सत्याला सामोरे जायला लावतात. पण त्यांच्यावर विश्वास ठेवता येईल?
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1878914)
आगंतुक पटल : 301