अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत केली अर्थसंकल्पपूर्व चर्चा
Posted On:
25 NOV 2022 6:16PM by PIB Mumbai
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज दिल्ली येथे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या (विधानमंडळ असलेले) अर्थमंत्र्यांशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री (अर्थ), मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल, अर्थमंत्री, मंत्री आणि राज्ये/ केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिवांनी बैठकीत सर्व सहभागींचे स्वागत केले आणि आगामी अर्थसंकल्पाच्या दृष्टीने या विशेष बैठकीचे महत्त्व सांगितले.

बहुतेक सहभागींनी त्यांच्या राज्य/ केंद्रशासित प्रदेशांना कर्ज घेण्याची मर्यादा वाढवून, आगाऊ दोन हप्ते आणि भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्याद्वारे आर्थिक मदत केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्र्यांचे आभार मानले. उपस्थितांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्पीय भाषणात समावेश करण्यासाठी अनेक सूचनाही दिल्या. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पाबाबतच्या सूचनांसाठी सहभागींचे आभार मानले आणि प्रत्येक प्रस्ताव तपासून पाहण्याचे आश्वासन दिले.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878894)