ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

भारताने 2023 ते 2025 या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल आयोगाचे उपाध्यक्षपद आणि धोरणात्मक व्यवस्थापन मंडळचे अध्यक्षपद जिंकले

Posted On: 25 NOV 2022 4:17PM by PIB Mumbai

 

नुकत्याच अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल आयोगाच्या बैठकीत आयईसीच्या सर्व  सदस्यांनी केलेल्या मतदानात भारताला 90% पेक्षा जास्त मते मिळाली. आयईसी मधील भारतीय राष्ट्रीय समिती  आणि  भारतीय मानक ब्युरो (BIS-India) च्या विविध तांत्रिक समित्यांच्या सदस्याची प्रतिनिधी म्हणून निवड झाली.

आंतरराष्ट्रीय मंकीकरण संस्था आणि आयईसीच्या धोरण आणि प्रशासकीय संस्थांमध्ये बीआयएसचे प्रतिनिधित्व हे सुनिश्चित करते की महत्त्वाच्या धोरणात्मक आणि रणनीती विषयक बाबींवर भारतीय दृष्टिकोन समजून घेतला जाईल.  तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील  सर्वोत्तम पद्धतींशी  भारतीय राष्ट्रीय मानकीकरण प्राधान्यक्रम संरेखित करण्याची संधी देखील यामुळे मिळेल.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्रीपीयूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करून BIS सातत्याने  आंतरराष्ट्रीय मंचावर आपले अस्तित्व दाखवत आहे.  सध्या BIS हे आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था (ISO) आणि आयईसीच्या विविध धोरणात्मक आणि प्रशासकीय संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करते. जसे की ISO परिषद, ISO तांत्रिक व्यवस्थापन मंडळ (TMB), IEC SMB, IEC बाजारपेठ रणनीती मंडळ (MSB), IEC व्यवसाय  सल्लागार समिती (BAC) यांचा यात समावेश होतो.

आयईसी ही एक आंतरराष्ट्रीय मानक संस्था आहे जी सर्व इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक आणि संबंधित तंत्रज्ञानासाठी आंतरराष्ट्रीय मानके निर्धारित करते.  मानकीकरण व्यवस्थापन मंडळ  ही आयईसीची सर्वोच्च प्रशासकीय संस्था असून तांत्रिक धोरण बाबींसाठी जबाबदार  आहे.

भारताचे प्रतिनिधित्व करणारे विमल महेंद्रू हे आयईसीचे उपाध्यक्ष असतील.

***

S.Kane/G.Deoda/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1878842) Visitor Counter : 164