माहिती आणि प्रसारण मंत्रालय
रिहर्सल हा अतीमानव आणि अभिनेता यांच्यातील विरोधाभास मध्यवर्ती मंचावर प्रकट करणारा चित्रपट: दिग्दर्शक खुस्नोरा रोझमाटोवा
गोवा/मुंबई, 24 नोव्हेंबर 2022
सुप्रसिद्ध जर्मन तत्ववेत्ता फ्रेडरिक नित्शे यांच्या मते 'अतिमानव' हे भविष्यातील मानवाचे ध्येय्य नसून आदर्श असेल. सुफी तत्त्वज्ञानातही हेच तत्त्वज्ञान स्वीकारले जाते. माणूस नेहमीच क्षणिक असतो, त्यावर मात करता येत नाही. अतीमानावाचा आत्मा म्हणजे, म्हणजेच परिपूर्णतेचा शोध.
गोव्यामधील 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय पॅनोरमा विभागांतर्गत प्रदर्शित झालेल्या ‘रिहर्सल’ चित्रपटाचे कथानक याच मुख्य तत्त्वज्ञानाभोवती फिरते. "इफ्फी टेबल टॉक्स" ला संबोधित करताना, दिग्दर्शक खुस्नोरा रोझमाटोवा यांनी आज सांगितले की हा चित्रपट पूर्वेकडच्या आणि पश्चिमेकडेच्या, दोन्ही ठिकाणच्या महामानवांच्या तत्त्वज्ञानाने प्रेरित आहे. "रिहर्सल" थिएटरमध्ये काम करणारा नायक, ऑरझू, याच्या माध्यमातून अतीमानवा मधील गतीशीलता प्रकट करते. "तिचे नाटक एका श्रेष्ठ पुरुषाच्या जन्माविषयी वर्णन करते, कारण जेव्हा श्रेष्ठ पुरुष जन्माला येतो, तेव्हा लोक अत्याचार, दुःखापासून मुक्त होतात आणि त्या निर्मात्याशी एकरूप होतात", त्या पुढे म्हणाल्या.
भारतीय चित्रपटसृष्टीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खुस्नोरा म्हणाल्या की, राज कपूर यांच्या चित्रपटातील गाणी उझबेकिस्तानमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्या पुढे म्हणाल्या की उझबेकिस्तानमध्ये जास्त महिला चित्रपट निर्मात्या नाहीत, पण अलीकडच्या काळात यात हळूहळू बदल होत आहे.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Rehearsal-1U0M5.jpg)
'इफ्फी टेबल टॉक्स'ला संबोधित करताना दिग्दर्शक खुस्नोरा रोझमाटोवा)
आंतरराष्ट्रीय पॅनोरमा अंतर्गत ‘रिहर्सल’ हा चित्रपट काल इफ्फी-53 मध्ये प्रदर्शित करण्यात आला.
‘रिहर्सल’ चित्रपट:
मूळ शीर्षक: Repititsia
दिग्दर्शक आणि पटकथा लेखक: खुस्नोरा रोझमाटोवा
निर्माता: रुस्तम जामिलोव
डीओपी: इस्लोम रीसोलोव
संपादक: तैमूर कियासोव
कलाकार: तोहिर सैदोव, एलमिरा रहीम जोनोवा, झारीफा जी'आफुरोवा, मुस्लिमा मुहम्मदी येवा
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Rehearsal-2PD5D.jpg)
सारांश:
ओरझू एक नाट्य कलाकार आहे. चित्रपटाची सुरुवात एका दृश्याने होते जिथे दिग्दर्शक आपल्या मुलाची एका जुन्या सिनेगॉगमध्ये सुंता करतो, ज्या धार्मिक कथेचा संदर्भ देऊन अब्राहमने इश्माएलचा बळी देण्याचे ठरवले. एक नवीन नाटक श्रेष्ठ माणसाच्या जन्माबद्दल बोलते, कारण जेव्हा एखादा श्रेष्ठ माणूस जन्माला येतो, तेव्हा लोक अत्याचारापासून, दुःखापासून वाचतात आणि त्या निर्मात्याशी एकरूप होतात. ओरझू हा चित्रपटाचा नायक आहे, पण हे स्पष्ट आहे की श्रेष्ठ माणसाच्या कल्पनेची सध्या गरज नाही, कारण लोक त्यासाठी अद्याप तयार नाहीत.
येथे पूर्ण संवाद पहा:
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![](http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Twitter-iconI0HR.jpg)
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878699)
Visitor Counter : 240