माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘लोटस ब्लूम्स’ या मैथिली भाषेतील चित्रपटात मोठ्या प्रमाणात प्रतीकांचा वापर करून एक आई आणि मुलातील भावनिक बंधाचे चित्रण करण्यात आले आहे चित्रपट म्हणजे व्यावसायिकता नव्हे तर चित्रपट म्हणजे भावना आणि प्रेक्षकांच्या मनाशी जोडलेल्या भावना : दिग्दर्शक प्रतिक शर्मा


आपल्या सृष्टीने एखाद्यासाठी जे योजलेले असते ते नेहमीच घडते : पटकथाकार अस्मिता शर्मा

प्रादेशिक चित्रपटांमध्ये बहुतांश वेळा भारताचा अर्क प्रतिबिंबित झालेला असतो: ज्येष्ठ अभिनेता अखिलेंद्र छत्रपती मिश्रा

Posted On: 24 NOV 2022 6:36PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 24 नोव्‍हेंबर 2022

 

दिग्दर्शक प्रतिक शर्मा त्यांच्या ‘लोटस ब्लूम्स’ या मैथिली फिचर फिल्म मागील प्रेरणेबद्दल सांगताना म्हणाले की निसर्ग आणि लोकांच्या साक्षीने एका व्यक्तीचा भावनिक प्रवास चितारणे हा या चित्रपट निर्मितीच्या मागचा विचार होता. पण त्यांना हा विचार रंजक पद्धतीने मांडायचा होता. आपल्या सृष्टीने एखाद्यासाठी जे योजलेले असते ते नेहमीच घडते, कधी कधी ते अनपेक्षित पद्धतीने घडते आणि अशा वेळी मानवी योजना अपयशी देखील ठरतात अशा शब्दांत पटकथाकार अस्मिता शर्मा यांनी ‘लोटस ब्लूम्स’ची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट केली. “कधीकधी आयुष्याचा प्रवास बिकट होऊन जातो, पण जेव्हा तुम्ही स्वतःला निसर्गाच्या आणि परमेश्वराच्या पायाशी लीन करता तेव्हा आश्चर्यकारकरित्या अडचणी दूर होतात,” त्या पुढे म्हणाल्या. 

53 व्या इफ्फीमध्ये पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘टेबल टॉक्स’ या चर्चात्मक कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘लोटस ब्लूम्स’ चित्रपटाचा कलाकार वर्ग आणि इतर तंत्रज्ञांनी पत्रकार परिषदेत उपस्थितांशी संवाद साधला.
 

53व्या इफ्फीमध्ये रेड कार्पेटवर ‘लोटस ब्लूम्स’ चित्रपटाचे पथक

इफ्फीमध्ये 23 नोव्हेंबर 2022 रोजी ‘लोटस ब्लूम्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रतिक शर्मा, निर्माता आणि पटकथाकार अस्मिता शर्मा, अभिनेता अखिलेंद्र छत्रपती मिश्रा आणि चित्रपटाचे कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा सत्कार करण्यात आला.

   

पत्रकार परिषदेत अभिनेता अखिलेंद्र छत्रपती मिश्रा आणि दिग्दर्शक प्रतिक शर्मा

 

चित्रपट सारांश 

53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागात मैथिली भाषेतील ‘लोटस ब्लूम्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात संदेश देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतीकांचा वापर करून एक आई आणि मुलातील भावनिक बंधाचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटात फार कमी संवाद आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण बिहारच्या अंतर्गत भागांमध्ये करण्यात आले आहे.

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1878621) Visitor Counter : 165


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu