माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

“द यंग आर्सेनिस्ट’ ची प्रेरणा मला माझ्या बालपणातून मिळाली: दिग्दर्शिका शैला पै


“कॅनेडियन गॉथिक साहित्यावरुन माझी दृष्यकला प्रेरित झाली आहे”

गोवा/मुंबई, 24 नोव्‍हेंबर 2022

 

कॅनडाच्या विरळ लोकवस्तीच्या भागातील शेतकरी समुदायातील पौगंडावस्थेतील चार मुली एकत्र येऊन आपलं भयाण आयुष्य मागे सोडून पळून जातात यावर आधारित ही कथा आहे. वापरात नसलेल्या  एका घरत त्या राहू लागतात आणी त्यांच्यात एक उत्कट बंध त्यात होतात आणि प्रचंड ओढ निर्माण होते, त्यातून त्या अशा स्थितीत येतात जिथे त्यांच्या मनात खोलवर असलेली भीती आणि सुप्त इच्छा त्यांची सुरक्षित जागा नष्ट करतात. 53व्या अंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाच्या ‘जागतिक सिनेमा’ या विभागात दाखविण्यात आलेला, कॅनडाच्या  शैला पै दिग्दर्शित द यंग आर्सेनिस्ट या सिनेमातून या मुली कशा प्रकारे त्यांच्या हतबलतेचे रुपांतर एकत्रितपणे  करतात याची झलक बघायला मिळते. 

इफ्फी 53 दरम्यान पत्र सूचना कार्यालायाद्वारे आयोजित पत्रकार आणि प्रतिनिधींच्या संवादात बोलताना, या चित्रपटाच्या दिग्दर्शिका शैला पै म्हणाल्या, या कथेची बहुतांश प्रेरणा त्यांच्या बालपणातून आणि त्यांनी आपल्या आयुष्यात बघितलेल्या खऱ्या व्यक्तींमधून घेतली आहे.

चित्रपटात दाखविलेल्या वापरात नसलेल्या फार्म हाऊसबद्दल बोलताना, शैला पै म्हणाल्या, लहानपणी ग्रामीण भागातील अशा वापरात नसलेल्या घरांत शिरणे हा एक छंद होता. “मला भीती, उत्सुकता, आश्चर्य या भावनांचा अनुभव घेणे आणि वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेणे नेहमीच आवडत आले आहे. माझा पहिला लघुपट मी 18 वर्षांची असताना बनविला ज्याच्या चित्रीकरणासाठी एक ट्रायपॉड घेऊन मी एका वापरात नसलेल्या घरत शिरले आणि आतील वस्तूंचे चित्रीकरण केले.

माझ्या चित्रपटांना अशा अनुभवांनी नकळतपणे प्रेरणा दिली असणार,” त्या म्हणाल्या. चित्रपटात दाखविण्यात आलेले दृश्य रूपक अग्नी ही विध्वंसक शक्ती नसून, ओझ्याखाली दबलेले दुःखी आयुष्य शुद्ध करणारे तत्व म्हणून दाखवले आहे. “जेव्हा चित्रपटाची नायिका शेवटी आपले घर जाळून टाकते, मला ती नकारात्मक घटना म्हणून दाखवायची नव्हती, तर ती एक सकारात्मक गोष्ट होती. तिने शेवटी स्वातंत्र्य मिळविले, वस्तुस्थितीचा सामना केला आणि पुढच्या मार्गाला लागली. आयुष्यात अनेक गरजेचे विरोधाभास आहेत. मला माझ्या चित्रपटासाठी आनंदी किंवा दुःखी शेवट हवाच असा माझा आग्रह नव्हता. मी याविषयी खूप आशावादी आहे,” त्या म्हणाल्या.

शैला पै म्हणाल्या चित्रपटाची संहिता लिहिण्यापूर्वीच त्यांनी प्रमुख व्यक्तिरेखांना विशिष्ट रंग दिले होते. एक मुलगी लाल आहे, एक मुलगी पिवळी आहे, एक मुलगी निळी आहे आणि एक मुलगी हिरवी आहे. आणि या मुलींचा शोध या रंगांनुसार घेणे हे माझे तत्व बनले, त्या म्हणाल्या. लाघुपटां पासून फिचर फिल्म्स कडे झालेल्या स्थित्यंतराबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, हा प्रवास मनोरंजक होता, आव्हानात्मक आणि अतुलनीय होता. या चित्रपटाच्या निर्मात्या अगाथा डेस्लोर्बो यांनी सांगितले की, इफ्फी नंतर द यंग आर्सेनिस्ट हा चित्रपट कैरो चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येईल. द यंग आर्सेनिस्ट या चित्रपटाचा आशिया प्रीमियर 53 व्या इफ्फी मध्ये झाला, तर जागतिक प्रीमियर टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 दरम्यान झाला होता.

 

कथासार

1980 च्या दशकातील ग्रामीण कॅनडाच्या पार्श्वभूमीची कथा असलेला शीला पै यांची पहिलीच रहस्यमय फिचर फिल्म चार किशोरवयीन मुलींभोवती फिरते - या प्रत्येक मुलीला काही ना काही कौटुंबिक वेदना सलत असते - या मुलींचे एकमेकींशी असलेले नाते संपूर्ण उन्हाळ्यात मजबूत होत जाते आणि त्याची परीक्षा देखील होत राहते.

 

दिग्दर्शिकेविषयी

शीला पै या आंतरराष्ट्रीय ख्यातनाम विजुअल आर्टिस्ट आहेत आणि त्यांचे लघुपट लोकार्नो आणि टीआयएफएफ यासारख्या प्रतिष्ठित चित्रपट माहित्सावांत दाखविण्यात आले आहेत. त्यांचा लघुपट ‘द रेड वर्जिन’ चा प्रीमियर टीआयएफएफ 2011 मध्ये झाला होता आणि त्याला स्पेनमधील वालाडोलीड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  नाईट ऑफ द स्पॅनिश शॉर्ट फिल्म पुरस्कार मिळाला आहे.

संदर्भ:

https://letterboxd.com/film/the-young-arsonists/

https://thefilmstage.com/tiff-review-the-young-arsonists-shows-unique-beauty-and-style/

https://iffigoa.org/cinema-of-the-world/the-young-arsonists/

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1878616) Visitor Counter : 252