संरक्षण मंत्रालय
मंजुला (यार्ड 786) या 250 माणसांची क्षमता असलेल्या सातवी फेरी क्राफ्ट नौका नौदलाच्या सेवेत रूजू
Posted On:
23 NOV 2022 9:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2022
पश्चिम बंगालचे परिवहन मुख्य सचिव बिनोद कुमार यांनी आज सातव्या फेरी क्राफ्ट मंजुला (यार्ड 786) या 250 माणसांची क्षमता असलेल्या नौकेचे आज जलावतरण केले. कोलकात्याचे युद्धनौका उत्पादन अधीक्षक कमोडोर इंद्रजित दासगुप्ता यांच्या उपस्थितीत शालिमार वर्क्स लिमिटेड येथे हा कार्यक्रम झाला. मंजुलातील सर्व प्रमुख आणि साहाय्यकारी, पूरक उपकरणे/ प्रणाली देशातील उत्पादकांनी तयार केल्या आहेत. त्यामुळे ही नौका संरक्षण मंत्रालयाच्या मेक इन इंडिया उपक्रमाची एक अभिमानास्पद निर्मिती ठरली आहे.
केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून अशा प्रकारच्या सात नौकांचे बांधकाम आणि वितरण शालिमार कंपनीने पूर्ण केले. सात पैकी सहा फेरी क्राफ्ट या आधीचं पोर्ट ब्लेअर, विशाखापट्टणम आणि मुंबई बंदरांवर सेवेत दाखल झाल्या आहेत. त्यांची निर्मिती 25 वर्षांचा सेवाकाल देता येईल अशी केली आहे. मंजुला सेवेत दाखल झाल्यामुळे भारतीय नौदलाच्या ऑपरेशनल आणि लॉजिस्टिक्स गरजा भागविण्यासाठी चालना आणि प्रोत्साहन मिळणार आहे.
S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1878385)
Visitor Counter : 163