कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अनुभव पुरस्कार विजेत्यांचे अनुभव कथन करणारी देशव्यापी वेबिनार मालिका “अनुभव"

Posted On: 23 NOV 2022 7:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2022

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार निवृत्तिवेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने मार्च 2015 मध्ये सरकारसोबत काम करताना निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे अनुभव सामायिक करण्यासाठी 'अनुभव' नावाचे एक ऑनलाइन व्यासपीठ सुरू केले आहे. विभागाच्या अनुभव पोर्टलशी संबंधित एकूण 92 संस्था आणि 8778 अनुभव लेखन प्रकाशित झाले आहे. विभागाने 2016 पासून 50 अनुभव पुरस्कार दिले आहेत.

आता, अनुभव पुरस्कार विजेत्यांना त्यांचे अनुभव राष्ट्रव्यापी मासिक वेबिनार मालिकेद्वारे देशासमोर मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने घेतला आहे. पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, पुरस्कार विजेत्यांचे अनुभव त्यांच्या संस्थेची आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांची क्षमता वाढविण्यात मदत करेल. तसेच इतर सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे शासकीय सेवेतील अनुभव विभागाच्या 'अनुभव' पोर्टलवर सादर करण्यासाठी देखील प्रोत्साहन मिळेल.

त्यानुसार, अनुभव पुरस्कारप्राप्त व्यक्तींकडून त्यांच्या कामाचा अनुभव देशापर्यंत पोहोचवण्यासाठी या विभागाने अनुभव वेबिनार मालिका सुरू केली. 22.11.2022 रोजी निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित "अनुभव अवॉर्डीज स्पीक" या विषयावरील राष्ट्रव्यापी वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी, प्रमुख वक्ते विक्रम साराभाई अंतराळ संस्थेचे (VSSC), ISRO सेवानिवृत्त वरिष्ठ अभियंता /शास्त्रज्ञ डॉ. हेलन बेसिल तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ के. सांतेप्पा यांनी त्यांचे अनुभव सांगितले.

या वेबिनारमध्ये, पुढील एका वर्षात निवृत्त होणारे सरकारी कर्मचारी, मंत्रालय/ विभाग/ संस्थांचे अधिकारी, पेन्शनर्स असोसिएशन, अनुभव पुरस्कार विजेते सहभागी झाले होते.

 

  S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1878343)
Read this release in: English , Urdu , Hindi