जलशक्ती मंत्रालय

पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या वतीने जल जीवन सर्वेक्षण 2023 आणि स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 वर जिल्हाधिकाऱ्यांची राष्ट्रीय परिषद आयोजित

Posted On: 23 NOV 2022 5:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2022

पेयजल आणि स्वच्छता विभागाने जल जीवन सर्वेक्षण 2023 आणि स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 यावर जिल्हाधिकाऱ्यांची राष्ट्रीय परिषद आयोजित केली. या आभासी परिषदेला पंचायती राज मंत्रालयाचे सचिव सुनील कुमार, ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा, प्रधान सचिव आणि अभियान संचालक तसेच जिल्हाधिकारी/जिल्हा दंडाधिकारी उपस्थित होते.

आपण जलस्रोत शाश्वत करण्यासाठी लक्ष केंद्रित करणे आणि काम करणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचा सतत पुरवठा करण्यासाठी समुदायांनी पाणीपुरवठा संरचनेची मालकी घेतली पाहिजे., असे पेयजल विभागाच्या सचिव विनी महाजन यांनी सांगितले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले आणि इतरांना स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 ची तयारी सुरू करण्यास प्रोत्साहित केले. "स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण हा केवळ मानांकनासाठीची औपचारिकता नाही तर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण 2.0 साठी संबंधित घटक उपलब्धत व्हावेत यासाठी तत्पर कृती करण्याचे एक साधन आहे.", असे त्यांनी सांगितले. प्रगतीत भागीदार असलेले बचत गट कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत मदत करतात आणि आवश्यक तेव्हा समर्थन देतात, असे ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव, नागेंद्र नाथ सिन्हा यांनी सांगितले. जिल्ह्यांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाच्या प्रयत्नांची पंचायती राज मंत्रालयाचे सचिव सुनील कुमार यांनी प्रशंसा केली. या स्पर्धेमुळे कामगिरी सुधारेल आणि सर्वांसाठी पिण्याचे पाणी तसेच स्वच्छता सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे ते म्हणाले.

जल जीवन सर्वेक्षण 2023 आणि स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना प्रत्येक महिन्यात चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहित करतील आणि चांगली सेवा प्रदान करण्यात मदत करती,‌ अशी आशा उपस्थितांनी व्यक्त केली.

देशाच्या पाणी आणि स्वच्छतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पेयजल आणि स्वच्छता विभाग दोन प्रमुख कार्यक्रम राबवत आहे- स्वच्छ भारत मिशन- ग्रामीण आणि जल जीवन मिशन. स्वच्छ भारत मिशन- ग्रामीण भागाला संपूर्ण स्वच्छता पुरवून ग्रामीण भारताला ओपन डिफिकेशन प्लस बनवण्याचे उद्दिष्ट ठेवते, तर जल जीवन मिशन प्रत्येक घराला दर्जेदार नळपाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवते. स्वच्छ भारत मिशन- ग्रामीण आणि जल जीवन मिशन या दोन्ही अंतर्गत देखरेख आणि मूल्यमापन यंत्रणेपैकी एक म्हणजे मूल्यांकन सर्वेक्षण म्हणजे, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण आणि जल जीवन सर्वेक्षण. यामुळे राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या जिल्ह्यांची स्वच्छ भारत मिशनमधील कामगिरीच्या आधारावर क्रमवारी लावली जाते.

Category

Rank

 District

Best Performing District

Front Runners (100% coverage)

1st Rank

Ambala, Haryana

2nd Rank

Rohtak, Haryana

3rd Rank

Faridabad, Haryana

High Achievers (75% to 100% coverage)

1st Rank

Kolasib, Mizoram

2nd Rank

Serchhip, Mizoram

3rd Rank

Ranipet, Tamil Nadu

Achievers (50% to 75% coverage)

1st Rank

Champhai, Mizoram

2nd Rank

Mamit, Mizoram

3rd Rank

Mayiladuthurai, Tamil Nadu

Performers (25% to 50% coverage)

1st Rank

Kallakurichi, Tamil Nadu

2nd Rank

East Jaintia Hills, Meghalaya

3rd Rank

Mon, Nagaland

Aspirants (0% to 25% coverage)

1st Rank

Shahjahanpur, Uttar Pradesh

2nd Rank

Bulandshahr, Uttar Pradesh

3rd Rank

Bareilly, Uttar Pradesh

Fastest Moving District

Achievers

1st Rank

Leh, Ladakh

2nd Rank

Kargil, Ladakh

3rd Rank

Gangtok, Sikkim

Performers

1st Rank

Mon, Nagaland

2nd Rank

East Jaintia Hills, Meghalaya

3rd Rank

Mahoba, Uttar Pradesh

Aspirants

1st Rank

Shahjahanpur, Uttar Pradesh

2nd Rank

Mirzapur, Uttar Pradesh

3rd Rank

Bullandshahr, Uttar Pradesh

Graduating Districts

Graduating to High Achievers

Namakkal, Tamil Nadu

Kodagu, Karnataka

Chamaranjanajra, Karnataka

West Godavari, Andhra Pradesh

Ananthapuramu, Andhra Pradesh

Rudraprayag, Uttarakhand

Graduating to Achievers

Raipur, Chhattisgarh

Hardwar, Uttarakhand

Umaria, Madhya Pradesh

Chitradurga, Karnataka

Graduating to Performers

Bullandhshahr, Uttar Pradesh

Mirzapur, Uttar Pradesh

Udalguri, Assam

Lalitpur, Uttar Pradesh

Srikakulam, Andhra Pradesh

Saharanpur, Uttar Pradesh

Tonk, Rajasthan

 

S.Tupe/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 1878283) Visitor Counter : 173


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu