माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

भारतीय पॅनोरमा (नॉन-फीचर फिल्म्स) च्या ज्युरी सदस्यांनी इफ्फी 53 मध्ये माध्यमांशी साधला संवाद


सिनेमॅटिक, सौंदर्य आणि नाट्यमय उत्कृष्टतेने समृद्ध सर्वोत्कृष्ट काम निवडण्याचा प्रयत्न होता : ज्युरी अध्यक्ष ओइनम डोरेन

गोवा/मुंबई, 21 नोव्‍हेंबर 2022

 

भारतीय पॅनोरमा कथाबाह्य (नॉन-फीचर फिल्म्स) विभागाच्या ज्युरी सदस्यांनी 21 नोव्हेंबर 2022 रोजी गोवा येथे 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) माध्यमांशी संवाद साधला.

ज्युरी सदस्यांनी घेतलेल्या कठोर निवड प्रक्रियेवर ज्युरी अध्यक्ष आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते ओइनम डोरेन यांनी प्रकाश टाकला. ते  म्हणाले, "15 दिवसांच्या कालावधीत, आम्ही 242 चित्रपट पाहिले आणि त्यापैकी फक्त 20 निवडले. ही एक तणावपूर्ण परंतु मनोरंजक प्रक्रिया होती."

कथाबाह्य चित्रपटातल्या एट्रीजमधून काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड करताना ज्युरी त्यांच्या मतासाठी एकमताने कसे ‍ठाम उभे राहिले डोरेन यांनी सांगितले. ते म्हणाले की सिनेमॅटिक, सौंदर्य आणि नाट्यमय उत्कृष्टतेने समृद्ध आहे ते सर्वोत्कृष्ट काम निवडण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

"काही एन्ट्रीज खूप आनंददायक होत्या आणि काही एन्ट्रीज तितक्याशा चांगल्या नव्हत्या. असे सगळे मिश्रण होते. सर्वोत्तम शोधणे हे एक कठीण काम होते, तरीही आम्ही बऱ्यापैकी चांगले शोधण्यात यशस्वी झालो.", असे पुरस्कार विजेते चित्रपट समीक्षक, ज्येष्ठ पत्रकार आणि ज्युरी सदस्य  ए चंद्रशेखर यांनी सांगितले.

चांगला आशय निवडण्याचा सारखाच ध्यास असलेल्या टीमसोबत काम करताना प्रचंड आनंद झाल्याचे चित्रपट निर्माता, पटकथा लेखक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते निवेदक हरीश भिमाणी यांनी सांगितले. "सातही सदस्यांनी एकमताने 242 चित्रपट एकत्र पाहण्याचा निर्णय घेतला. हे ज्युरींच्या बौद्धिक प्रामाणिकपणाचे लक्षण आहे.", असे  ते म्हणाले.

निवडलेल्या आशयातील विविधता टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांवर आणखी एक ज्युरी सदस्य राकेश मित्तल यांनी जोर दिला. ते म्हणाले , “ज्युरींनी विविधतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.”

इंडियन पॅनोरमा, 2022 मध्ये सुरुवातीला प्रदर्शित करण्यासाठी नॉन-फिचर फिल्म श्रेणीत दिव्या कावसजी दिग्दर्शित ‘द शो मस्ट गो ऑन’ या चित्रपटाची निवड ज्युरींनी केली. झपाट्याने लोकसंख्या कमी होत असलेल्या पारसी समुदायावर आधारित हा चित्रपट आहे.

ज्युरी सदस्यांच्या मते, हा चित्रपट पाहण्यायोग्य आणि माहितीपट यांचे म्हणजेच मनोरंजन आणि अर्थपूर्ण सिनेमाचे मिश्रण आहे. हा चित्रपटात संपूर्णपणे भारतीय सिनेमा प्रतिबिंबित होतो.

नॉन फीचर फिल्म्स श्रेणीतील चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठे उपलब्ध नसल्याबद्दल ज्युरींनी नाराजी व्यक्त केली. कथाबाह्य चित्रपटांनाही फिचर फिल्मससारखी वागणूक मिळावी अशी मागणी ज्युरींनी सर्वानुमते केली.

नॉन-फीचर फिल्म श्रेणीत सहा ज्युरी सदस्यांचा समावेश आहे, अध्यक्ष प्रख्यात चित्रपट निर्माते, निर्माता, लेखक आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते ओइनम डोरेन आहेत. ज्युरीमध्ये खालील सदस्य आहेत जे वैयक्तिकरित्या विविध प्रशंसा झालेल्या चित्रपटांचे आणि चित्रपटाशी संबंधित व्यवसायांचे, प्रतिनिधित्व करतात, तर एकत्रितपणे विविध भारतीय बंधुत्वाचे प्रतिनिधित्व करतात:

  1. चंद्रशेखर ए-  चित्रपट समीक्षक, पत्रकार आणि माध्यम अभ्यासक
  2. हरीश भिमाणी-  चित्रपट निर्माता, पटकथा लेखक, सूत्रसंचालक आणि अभिनेता
  3. मनीष सैनी-  चित्रपट निर्माता, लेखक आणि संपादक
  4. पी. उमेश नाईक-  चित्रपट निर्माता आणि पत्रकार
  5. राकेश मित्तल- चित्रपट समीक्षक, पत्रकार आणि लेखक
  6. संस्कार देसाई-  चित्रपट निर्माता, पटकथा लेखक, शिक्षणतज्ज्ञ

242 समकालीन भारतीय नॉन-फीचर चित्रपटांमधून भारतीय पॅनोरमा विभागात प्रदर्शित करण्यासाठी 20 नॉन-फीचर चित्रपटांचे पॅकेज निवडले गेले आहे. या चित्रपटांचे पॅकेज हे उदयोन्मुख आणि प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांची दस्तऐवजीकरण, तपास, मनोरंजन याबाबतच्या क्षमतेचे उदाहरण आहे. त्यातून समकालीन भारतीय मूल्ये प्रतिबिंबित होतात. 

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1878270) Visitor Counter : 178


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil