माहिती आणि प्रसारण मंत्रालय

53 व्या इफ्फीमध्ये प्रकाशन विभागाच्या दुर्मिळ साहित्याचा उघडला खजिना


भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या इतिहासावरील पुस्तके इफ्फीला भेट देणाऱ्या कलारसिकांसाठी ठरली चित्तवेधक

Posted On: 22 NOV 2022 9:48PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 22 नोव्‍हेंबर 2022

 

गोव्यात सुरु असलेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने आपली दुर्मिळ पुस्तके आणि मासिकांचे प्रदर्शन लावले आहे. अत्यंत नावाजलेल्या या महोत्सवात, उपलब्ध असलेली ही पुस्तके, महोत्सवाला भेट देणाऱ्या रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गोव्याच्या आयनॉक्स चित्रपट गृहात  हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याशिवाय, एनएफडीसी इफ्फीमध्ये आयोजित केलेल्या फिल्म बझार मध्येही, हे प्रदर्शन आणि विक्री सुरु आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून, प्रकाशन विभागाने भारतीय स्वातंत्र्यलढ्यावरील आणि स्वातंत्र्यसैनिकांवरील पुस्तके प्रदर्शनात ठेवली आहेत. हे प्रदर्शन, इथे येणाऱ्या सर्व रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याशिवाय, प्रकाशन विभागाची, भारतीय सिनेमावरील तसेच, कला आणि संस्कृती, नामवंत व्यक्तिमत्वे यांच्यावरील पुस्तके सुद्धा वाचकांसाठी उपलब्ध आहेत. त्याशिवाय बालसाहित्यही आहेच. तसेच, राष्ट्रपती भवनावरील पुस्तक, पंतप्रधानांची भाषणे, अशी प्रकाशन विभागाने प्रकाशित केलेली विशेष पुस्तके देखील उपलब्ध आहेत.

प्रकाशन विभागाच्या या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच जिंगा यांनी एकत्रितपणे विकसित केलेला “आझादी क्वेस्ट” हा व्हिडिओ गेमही इथे उपलब्ध आहे.

यातील मॅच 3 आणि हिरोज ऑफ भारत हे दोन्ही खेळ, मनोरंजन आणि शिक्षण करणारे आहेत. यातून मुलांना रंजक पद्धतीने भरताच्या स्वातंत्र्यलढ्याविषयी माहिती मिळते आणि या स्वातंत्र्यलढ्यात, स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या चित्तथरारक कार्यावर आधारित कथा, त्यांना खिळवून ठेवतात. इथे जाणाऱ्या रसिकांना, हे गेम्स खेळण्याची, डाऊनलोड करण्याची आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळते आहे.

प्रदर्शन विभागाचे हे प्रदर्शन, ई- 1 पव्हेलियन, प्रोमेनाड, फिल्म बझार, इफ्फी मध्ये आयनॉक्स, गोवा इथे 20 ते 24 नोव्हेंबर 2022 पर्यंत उपलब्ध आहे.

   

प्रकाशन विभागाच्या संग्रहित पुस्तकांचे प्रदर्शन आणि ‘आझादी क्वेस्ट’ गेम्स 

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1878138) Visitor Counter : 149